जाहिरात

Ro Ro Ferry: अखेर मुंबई ते विजयदुर्ग रो-रो सेवेचा मुहूर्त ठरला! कधी सुरु होणार?

महासंचालनालयाकडून परवानगी न मिळाल्याने सेवा सुरू करण्यास विलंब झाला. अशातच आता गौरी विसर्जनाच्या आधी ही सेवा सुरु करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. 

Ro Ro Ferry: अखेर मुंबई ते विजयदुर्ग रो-रो सेवेचा मुहूर्त ठरला! कधी सुरु होणार?

Mumbai to Konkan Ro Ro Ferry: कोकणवासियांना गणपतीला जलद आणि आरामात गावी जाण्यासाठी मुंबई ते विजयदुर्ग रो-रो सेवा सुरु करण्याची घोषणा करण्यात आली होती. मत्स्य आणि बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी यासाठी पुढाकार घेतला होता. मात्र गणपती उत्सव अवघ्या एक दिवसावर आला असतानाही ही रो रो सेवा सुरु न झाल्याने गणेशभक्तांचा हिरमोड झाला आहे. अशातच आता ही सेवा सुरु कधी होणार? याबाबत एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. 

मुंबईहून विजयदुर्ग, देवगड, सिंधुदुर्ग ही रो रो सेवा सुरु करण्याबाबत आता महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. गणपती बाप्पाच्या आगमनापूर्वी (Ganesh Chaturthi 2025) ही सेवा सुरु होणार होती. मात्र महासंचालनालयाकडून परवानगी न मिळाल्याने सेवा सुरू करण्यास विलंब झाला. अशातच आता गौरी विसर्जनाच्या आधी ही सेवा सुरु करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. 

Pune Ganeshotsav 2025: गणेश मंडळातील प्रसाद वाटपावर FDAची नजर! कशी घ्याल काळजी? वाचा मार्गदर्शक तत्वे

गणपतीचे आगमन हे २७ ऑगस्ट रोजी होणार आहे. त्यानंतर गणेशोत्सवाच्या दहाव्या दिवशी, म्हणजे साधारणपणे ६ सप्टेंबर २०२५ रोजी गौरी विसर्जन असणार आहे. तेव्हा ही रो रो सेवा सुरु होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. याबाबत मत्स्य आणि बंदर विकास मंत्री नितेश राणेही आज महत्त्वाची माहिती देण्याची शक्यता आहे. मुंबईहून सिंधुदुर्ग आणि सिंधुदुर्ग ते मुंबई अशा दोन्ही मार्गांवर ही सेवा सुरु करण्यात येणार असून कोकणातून पुन्हा मुंबईकडे येणाऱ्या प्रवाशांसाठी याचा जास्तीत जास्त फायदा होणार आहे. 

दरम्यान, देवगड, मालवण, राजापुरला जाणाऱ्या प्रेक्षकांसाठी ही बोट फायदेशीर ठरणार आहे. कोकण रेल्वेने हाच प्रवास करण्यासाठी १३- १४ तासांहून अधिक वेळ लागतो, जो आता अवघ्या सहा तासांवर येणार आहे. या रो रो सेवेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळेल, असा विश्वास सागरी महामंडळाने व्यक्त केला आहे.

Pune Manache Ganpati : पुण्यातील 5 मानाच्या गणपतींची मिरवणूक अन् पाणप्रतिष्ठापनेची वेळ ठरली, पाहा यादी!

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com