- गडचिरोली जिल्ह्यातील कनेरी गावात गेल्या पस्तीस वर्षांपासून बायोगॅसचा वापर स्वयंपाकासाठी नियमित सुरू आहे
- या गावात गायी आणि म्हशींच्या शेणाचा उपयोग करून बायोगॅस तयार केला जातो, ज्यामुळे गॅसपुरवठा सुरळीत आहे
- कनेरी गावात सध्या पंधरा ते वीस बायोगॅस यंत्रे कार्यरत असून त्यांचा वापर संपूर्ण गावाला ऊर्जा पुरवतो
मनिष रक्षमवार
इराण आणि इस्त्रायल यांच्यात युद्ध भडकलं आहे. त्याचा परिणाम भारताच्या गॅस आणि तेल पुरवठ्यावर झाला आहे. त्यामुळे देशभरात अनेक ठिकाणी गॅससाठी एजन्सीबाहेर भल्यामोठ्या रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. नागरिकांच्या चेहऱ्यावर टेन्शन आहे. गॅस नाही मिळाला तर काय होणार हा त्यांना भेडसावत असलेला प्रश्न आहे. पण एक असं गाव आहे त्या गावाला गॅसचं अजिबात टेन्शन नाही. गॅस नसला म्हणून त्याचं काही अडणार नाही.तुम्हाला वाटेल ते चुलीचा आणि लाकडांचा वापर करत असतील पण तसं ही नाही. त्या शिवाय ही हे गाव आपली ऊर्जेची गरज एका भन्नाट जुगाडाच्या माध्यमातून पुर्ण करत आहेत. गेल्या 35 वर्षापासून हे अविरत सुरू आहे.
गडचिरोली हा जिल्हा आदिवासी अतिदुर्गम जिल्हा आहे. तसेच वनसंपदेने नटलेला जिल्हा आहे. आजही ग्रामीण भागामध्ये जुन्या रूढी परंपरा इथं सुरू आहेत. युद्धजन्य परिस्थिती मुळे शहरी भागामध्ये गॅस सिलिंडर करिता बोंबाबोंब पाहायला मिळत आहे. अशात गडचिरोली जिल्ह्यातील कनेरी हे गाव अपवाद आहे. या गावाची लोकसंख्या 1900 आहे. यागावाल गॅसचं टेन्शन नाही. त्यासाठी त्यांनी एक जबरदस्त पर्याय शोधला आहे. या गावात मागील 35 वर्षापासून बायोगॅस पासून स्वयंपाक केला जातो.
बायोगॅससाठी लागणारा गाई- म्हशींचं शेण, केरकचरा लागतो. त्याचा वापर करून हा गॅस तयार केला जातो. देशात गॅस सिलेंडरचा हाहाकार असताना सुद्धा या गावाला गॅस सिलेंडरसाठी कधीच लाईन लावायची गरज भासली नाही. या गावात अर्ध्यापेक्षा जास्त घरात बायोगॅस तयार करण्यात आले आहे. याच गावातील केशव लाकडे हे बायोगॅसचे कारागीर आहेत. त्यांनी आतापर्यंत गावात तसेच इतरही गावात 50 च्या वर बायोगॅसचे बांधकाम केले आहे.
परंतु काही ठिकाणी गाई म्हशी कमी झाल्याने बायोगॅस यंत्र हे बंद झालेले आहेत. परंतु कनेरी या गावात 40 ते 50 बायोगॅस बनविण्यात आले होते. परंतु गायी मशी कमी झाल्याने गावात आता 15 ते 20 बायोगॅस यंत्र सुरू आहेत. 1984 सालच्या बायोगॅस योजनेच्या माध्यामातून हे बायगॅस तयार करण्यात आले होते. दहा ते बारा किलो शेणामध्ये 1 kg 200 ग्रॅम गॅस तयार होतो. त्याच प्रमाणे महिन्याची 36 किलो गॅस तयार होत आहे. त्या प्रक्रियेमधून निघाल्यानंतर टाकाऊ शेणाचे शेणखत म्हणून उपयोग केला जातो. त्यामुळे गॅसचा गॅस मिळतो आणि खतही मिळते. त्यामुळे डबल फायदा या गावकऱ्यांना होत आहे.