
संकेत कुलकर्णी, पंढरपूर
Gautami Patil On IPL 2025 : आयपीएलच्या 18 व्या हंगामाला सुरुवात झाली आहे. आयपीएलमधील कट्टर प्रतिस्पर्धी मानले जाणारे मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्स यांच्या रविवारी सामना पार पडला. त्याआधी डान्सर गौतमी पाटीलने कोणत्या संघाला सपोर्ट करणार हे सांगितलं आहे. हिंदवी महिला प्रतिष्ठान आणि ग्रँड रेसिडेन्सी यांच्या वतीने खास महिलांसाठी गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचे पंढरपुरात आयोजन करण्यात आले होते. तिथे ती बोलत होती.
मुंबई इंडियन्स की चेन्नई सुपरकिंग्स कोणत्या संघाला सपोर्ट करणार असा प्रश्न गौतमी पाटीलला विचारण्यात आला. त्यावर गौतमीने म्हटलं की, "मी महाराष्ट्रीय आहे. मी महाराष्ट्रात राहते. त्यामुळे आयपीएलच्या सामन्यात मी मुंबई इंडियन्सलाच सपोर्ट करणार आहोत. तुम्हीही सर्वजण मुंबई इंडियन्सला सपोर्ट करा," असं आवाहन देखील गौतमीने सर्वांना केलं.
सामन्यात काय घडलं?
चेन्नईने आपल्या पहिल्याच सामन्या मुंबई इंडियन्सला धुळ चारली आहे. मात्र मुंबईने दिलेल्या 156 धावांचे लक्ष्य गाठताना चेन्नईची मात्र चांगलीच दमछाक झाली. चेन्नईने विजयाचे लक्ष 20 व्या षटकात पूर्ण केले. धोनीला ही आठव्या क्रमांकावर फलंदाजीला उतरावे लागले. चेन्नईने लक्षाचा पाठलाग करताना 6 विकेट गमावल्या. चेन्नईकडून सर्वाधिक 65 धावा रचिन रविंद्रने केल्या. तर मुंबईने आयपीएलमध्ये पहिल्या सामन्यात पराभूत होण्याची परंपरा कायम राखली.
मुंबईकडून तिलक वर्माने सर्वाधिक 31 धावा केल्या तर सूर्यकुमार यादवने 29 धावांची खेळी केली. मुंबईकडून तिलक वर्माने 25 चेंडूमध्ये 31 धावांची खेळी करत मुंबईचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. या खेळीत त्याने 2 चौकार आणि 2 षटकार लगावले. याव्यतिरिक्त मुंबईच्या एकाही खेळाडूला मोठी धावसंख्या उभारता आली नाही.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world