माणगावात आढळले महाकाय पाखरू, अवघे 7 दिवसांचे असते आयुष्य

12 सप्टेंबर रोजी माणगाव तालुक्यातील उतेखोल येथील जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या पंपहाउसमधील भिंतीवर मोठे पाखरू दिसून आले होते.

Advertisement
Read Time: 2 mins
माणगाव:

रायगड जिल्ह्यातील माणगाव येथे सुमारे 10 इंच लांबीचे पतंगा सापडला आहे.फुलपाखरासारखा दिसणारा या 'पतंगा'ला शास्त्रीय भाषेत 'ऍटलास मॉथ' म्हणतात.  हा पतंगा जगातील पाच मोठ्या प्रजातीच्या फुलपाखरांपैकी एक आहे.  12 सप्टेंबर रोजी माणगाव तालुक्यातील उतेखोल येथील जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या पंपहाउसमधील भिंतीवर मोठे पाखरू दिसून आले होते. या पाखराबद्दलची माहिती पक्षीमित्र आणि अभ्यासक शंतनू कुवेसकर यांना देण्यात आली होती. कुवेसकर यांनी हे पाखरू म्हणजे पतंगा असल्याचे सांगितले. या पाखराच्या पंखावर मोठे पांढरे ठिपके आणि आकर्षक बदामी तपकिरी नक्षी असते. या फुलपाखरावर हल्ला करणाऱ्यांना पळवून लावण्यासाठी हे फुलपाखरू पंखांची अशा रितीने हालचाल करतं की त्यावरील नक्षी हल्ला करणाऱ्या कोब्रासारखी वाटते.  

हे पाखरू जगातील पाच मोठ्या पाखरांपैकी एक आणि आशियातील  सर्वात मोठे पाखरू आहे. पश्चिम घाटातील परिसरात हे पाखरू आढळते. उतेखोल इथे आढळलेले पाखरू हे मादी प्रजातीतील असून त्याची लांबी ही सुमारे 10 ते 11 इंच आहे.  पाखरू किंवा पतंगा हे रात्रीच्यावेळी दिव्याकडे आकर्षित होत असतात. हे पतंगा निशाचर असतात आणि दिवसा ते फारसे आढळून येत नाही. या पतंग्यांचे आयुष्य हे एक किंवा दोन आठवडे इतकेच असते. पतंगाला तोंड किंवा पचनसंस्था नसते ज्यामुळे ते काहीच खाऊ शकत नाही. नरापेक्षा मादी ही आकाराने मोठी असते. ही मादी हवेमध्ये  'फेरोमोन्स' नावाचे द्रव्य हवेत सोडते ते नराला प्रणयासाठी आकर्षित करण्यासाठी असते. नराला 'फेरोमोन्स'चा गंध हा काही किलोमीटर अंतरावरून येतो. 

'ऍटलास मॉथ' हा पतंग दालचिनी, लिंबू, जांभूळ, पेरूच्या झाडांवरच आढळतो. तिथेच त्यांचा प्रणय होतो आणि तिथेच मादी अंडीही घालते. मादी पतंगा एकावेळी तब्बल शंभर ते दोनशे अंडी घालते.  दहा ते चौदा दिवसांत अंड्यातून अळी  बाहेर येते. पुढचे 35 ते 40  दिवसही अळी  सतत झाडांची पाने खात असते. साधारणपणे 21 दिवसानंतर कोषातून पतंग बाहेर यतो. अंडी घातल्यानंतर पतंगा मरण पावतो. 
 

Topics mentioned in this article