'रक्त घ्या,पाणी द्या,नसेल तर कर्नाटकात जाण्यासाठी परवानगी द्या'

माडग्याळहून अंकलगी तलावात म्हैसाळ सिंचन योजनेचे पाणी सोडण्याबाबत निर्णय घ्या. हा निर्णय येत्या 22 जुलैपर्यंत न केल्यास आमरण उपोषणासह रस्ता रोको करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
सांगली:

सांगलीच्या जत तालुक्यातल्या पाण्यापासून वंचित गावांच्या पाणी प्रश्नासाठी तुकाराम बाबा महाराजांनी पुन्हा आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.माडग्याळहून अंकलगी तलावात म्हैसाळ सिंचन योजनेचे पाणी सोडण्याबाबत निर्णय घ्या. हा निर्णय  येत्या 22 जुलैपर्यंत न केल्यास आमरण उपोषणासह रस्ता रोको करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. शिवाय कर्नाटकमध्ये जाण्याचा इशारा ही त्यांनी दिला आहे. त्यामुळे प्रशासनाला याबाबत गांभिर्याने विचार करावा लागेल. 

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

जत तालुक्यातल्या पूर्व भागातील गावांना वर्षानुवर्ष दुष्काळाशी सामना करावा लागतो. म्हैसाळ विस्तारित योजना या भागाला मंजूर झाली आहे.मात्र तरी देखील 44 गावांच्या पाण्याचा प्रश्न तातडीने निकालात निघू शकतो,अशी परिस्थिती आहे. यासाठी तुकाराम बाबा महाराजांच्या नेतृत्वाखाली आंदोलन देखील करण्यात आली होती. माडग्याळहून अंकलगी तलावात म्हैसाळचे पाणी सोडल्यास ते पाणी व्हस्पेट,गुड्डापूर,संख,अंकलगी तलावात पोचू शकतं. त्यामुळे पाण्यापासून वंचित असणाऱ्या गावांना लाभ होऊ शकतो.

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - BMW HIT AND RUN : पोलिसी खाक्या! मिहिर शेवटी बोललाच, रीक्रिएशनमध्ये धक्कादायक खुलासा

या पाण्यासाठी 26 कोटी रुपये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून मंजूर देखील करण्यात आले होते. मात्र सहा महिने उलटून देखील या कामाची सुरुवात झाली नाही. त्यामुळे तुकाराम बाबा महाराज यांच्या नेतृत्वाखाली  दुष्काळग्रस्तांनी सांगली जिल्हाधिकारी यांच्यासह पाठबंधारे विभागाला निवेदन देऊन कामाला सुरुवात करावी,अशी मागणी केली. तसेच 22 जुलैपर्यंत याबाबत कार्यवाही न झाल्यास 23 जुलैपासून रस्ता रोकोसह बेमुदत आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला. त्याचबरोबर पाणी देण्यासाठी राज्य सरकारला आम्ही रक्त देखील द्यायला तयार आहोत,त्यामुळे रक्त घ्या,पाणी द्या,नसेल तर कर्नाटक मध्ये जाण्यासाठी आम्हाला परवानगी द्यावी,अशी मागणी देखील यावेळी तुकाराम बाबा महाराज यांनी निवेदनाद्वारे केली.
 

Advertisement