Gokul Milk prices increased : मदर डेअर, अमूलनंतर गोकुळचे दूध महागले, उद्यापासून दरवाढ लागू; पाहा नवी रेट लिस्ट

गोकूळ संघानेही दूधविक्री दरात वाढ केल्याने ग्राहकांच्या खिशाला फटका बसण्याची शक्यता आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins

गोकुळ दूध संघाने म्हैस आणि गाय दूध विक्री दरात प्रतिलिटर दोन रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. उद्यापासून त्याची अंमलबजावणी सुरू  होणार आहे. मुंबई, पुण्यात प्रतिलिटर 74 रुपये, तर कोल्हापूरसह इतर ठिकाणी लिटरला 68 रुपये मोजावे लागणार आहेत. गोकूळ दूध संघाने जानेवारीमध्ये म्हशीच्या दुधाचा दर, तर महिन्यापूर्वी गाईच्या दुधाचा खरेदी दर दोन रुपयांनी वाढवला होता. त्यानंतर आता पुन्हा विक्री दरात वाढ करण्यात आली आहे. 

NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

गेल्या काही दिवसांपासून विविध कंपन्यांनी दूध विक्रीदरात वाढ केली आहे. आता गोकूळ संघानेही दूधविक्री दरात वाढ केल्याने ग्राहकांच्या खिशाला फटका बसण्याची शक्यता आहे. अमूल आणि मदर डेअरी या कंपन्यांनी १ मे पासून दरवाढ केल्यानंतर आता गोकुळने देखील दूध दरात वाढ केली आहे. सोमवारपासून (5 मे) ही दरवाढ लागू होणार आहे.  

नक्की वाचा - Pune Traffic : पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! सर्वात वर्दळीचा परिसर 'वाहतूक कोंडीमुक्त' होणार!

गोकुळ दुधाच्या विक्री दरात प्रतिलिटर 2 रुपयांची वाढ

मुंबई व पुण्यात प्रतिलिटर 74 रुपये, तर कोल्हापूरसह इतर ठिकाणी लिटरला 68 रुपये आकारले जातील. मदर डेअरीने दुधाच्या किमतीत वाढ केल्यानंतर अमूलनेही प्रतिलिटर दुधामागे दोन रुपयांची वाढ केली आहे. 1 मेपासून नवी किमती लागू करण्यात आल्या आहेत. फूल क्रीम दुधाची किंमत 67 रुपयांनी वाढून 69 रुपये प्रतिलिटरपर्यंत पोहोचली आहे. आणि टोंड मिल्क 54 रुपयांनी वाढून 56 रुपयांपर्यंत पोहोचले. 

दुधाची किंमत का वाढली?

उत्पादन खर्चात वाढ झाल्यामुळे दुधाच्या किमतीत वाढ झाल्याचं सांगितलं जात आहे. कंपन्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हिटव्हेव आणि वाढत्या उकाड्यामुळे दुधाच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. याशिवाय शेतकऱ्यांना अधिक पैसे द्यावे लागत आहे, जनावरांच्या चाऱ्याच्या किमतीत वाढ, परिवहन आणि इतर गोष्टींमध्ये झालेल्या वाढीनंतर दुधाच्या किमती वाढविण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. 

Advertisement


वाढीव दरानुसार दुधाच्या किमती...

अमूल

अमूल गोल्ड - 69 रुपये प्रतिलिटर 
अमूल ताजा (टोंड मिल्क) - 57 रुपये प्रतिलिटर 
अमूल टी स्पेशल - 63 रुपये प्रतिलिटर


मदर डेअरी

फूल क्रीम दूध - 69 रुपये प्रतिलिटर 
टोंड दूध - 57 रुपये प्रतिलिटर 
डबल टोंड दूध - 51 रुपये प्रतिलिटर 
गायीचं दूध - 59 रुपये प्रतिलिटर 
टोंड दूध - 56 रुपये प्रतिलिटर 

Advertisement

गोकूळ 

गोकूळ स्पेशल -  74 रुपये प्रतिलिटर