Gold Silver Price: सोन्यानंतर चांदीच्या भावाला ही झळाळी, अब की बार एक लाखांच्या पार

चांदीचे भावही जीएसटी सह 1 लाख 3 हजार रुपयांवर गेले आहेत. वाढत्या सोन्या चांदीच्या भावामुळे ग्राहकांची चिंता मात्र वाढली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
जळगाव:

गेल्या काही दिवसापासून सोन्याच्या दरात वाढ होत असल्याची दिसून आली आहे. सोन्या बरोबरच चांदीच्या भावालाही आता झळाळी मिळाली आहे. सोन्या प्रमाणेच चांदीचे दरही आता एक लाख पार गेले आहेत. सोन्याच्या भावात 8 दिवसात 4 हजार रुपयांची तर 24 तासात दोन हजार रुपयांची वाढ झाली आहे. तर चांदीचे भावही जीएसटी सह 1 लाख 3 हजार रुपयांवर गेले आहेत. वाढत्या सोन्या चांदीच्या भावामुळे ग्राहकांची चिंता मात्र वाढली आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

सोन्याच्या भावाला पुन्हा झळाळी पाहायला मिळत आहे. सोन्याच्या भावात गेल्या आठ दिवसात चार हजार रुपयांची तर गेल्या 24 तासात दोन हजार रुपयांची वाढ झाली आहे. तर सोन्याच्या पाठोपाठ चांदीचे दरही एक लाखांच्या पार गेले आहेत. जळगाव सुवर्णनगरीत आज सोन्याचे भाव जीएसटी विना 96 हजार रुपये होते.  तर जीएसटी सह 98 हजार 800 रुपयांवर पोहोचला आहेत. 

ट्रेंडिंग बातमी - Pune News: वैष्णवीनंतर दीपा! लग्नात 4 तोळे सोने,10 लाखांचा खर्च केला, 1 महिन्यातच सूनेचा जीव घेतला

एकीकडे सोन्याचे दर वाढत असताना दुसरीकडे चांदी ही मागे राहीली नाही. चांदीचे भाव जीएसटी विना 1 लाख रुपये व जीएसटी सह 1 लाख 3 हजार रुपयांवर पोहोचले आहेत. जागतिक घडामोडींमुळे सोन्याचे भाव पुन्हा एकदा एक लाखांच्या पार जाण्याचा अंदाज सराफा व्यावसायिकांनी वर्तवला आहे. पण या वाढत्या सोन्याच्या भावामुळे ग्राहकांची चिंता मात्र कमालीची वाढली आहे. दर असेच वाढत राहीले तर सोने चांदी खरेदी करायचे की नाही असा प्रश्न त्यांना पडला आहे.