Todays Gold And Silver Price: गेल्या काही दिवसांपासून सतत सोन्या आणि चांदीच्या दरात चढ-उतार पाहायला मिळाले. ऐन लग्न सराईच्या दिवसात सोने- तसेच चांदीचे भाव चांगलेच वाढताना दिसत आहे. या दरवाढीमुळे सोने खरेदी करणे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहे. काय आहेत सोने- चांदीचे आजचे दर? जाणून घ्या..
सोन्या- चांदीचे दर गगनाला भिडले...
जागतिक बाजारपेठेतील घडामोडी आणि गुंतवणूकदारांचा वाढता कल यामुळे सोने- चांदीच्या किमतींनी पुन्हा एकदा उच्चांक गाठला आहे. नागपूरच्या सराफा बाजारात अवघ्या 24 तासांत सोन्याच्या दरात प्रति 10 ग्रॅम 1000 रुपयांची वाढ झाली असून, चांदीने देखील 10 हजार रुपयांची मोठी उडी घेतली आहे. लग्नसराईच्या काळात दरातील ही वाढ सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लावणारी ठरत आहे.
26 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 10 वाजता नागपुरात स्टँडर्ड सोन्याचा (99;5) विक्री दर 1,37,900रुपये होता. मात्र, 27 डिसेंबर रोजी तो वाढून 1,38,900 रुपयांवर पोहोचला. दागिन्यांसाठी वापरल्या जाणाऱ्या 22 कॅरेट (916) सोन्याचा दर 1,28, 200 रुपयांवरून 1,29,200 रुपये झाला आहे. 18 कॅरेट सोन्यासाठी ग्राहकांना आता1,07,600 रुपयांऐवजी 1,08,300 रुपये मोजावे लागणार आहेत, तर 14 कॅरेटचा दर 89,600 रुपयांवरून 90, 300 रुपयांवर गेला आहे.
सराफा बाजारात केवळ विक्रीच नव्हे, तर खरेदी दरातही वाढ झाली आहे. 27 डिसेंबर रोजी व्यापाऱ्यांनी स्टँडर्ड सोन्यासाठी1,37,900 रुपये खरेदी दर निश्चित केला आहे, जो आदल्या दिवशी 1,36,900 रुपये होता. 22 कॅरेट सोन्याचा खरेदी दर1,26,200 रुपयांवरून1,27,200 रुपये झाला आहे. सोन्यापाठोपाठ चांदीनेही मोठी झेप घेतली आहे.
26 डिसेंबर रोजी चांदीचा विक्री दर 2,28,500 रुपये प्रति किलो होता, तो 27 डिसेंबर रोजी थेट 2,38,400 रुपयांवर पोहोचला आहे. म्हणजेच चांदीच्या दरात एका दिवसात 9,100 रुपयांची वाढ झाली आहे. दुसरीकडे, प्लॅटिनमचे दर मात्र 70,000 रुपयांवर स्थिर राहिले आहेत. ग्राहकांनी लक्षात घ्यावे की, वर नमूद केलेल्या दरांमध्ये मेकिंग चार्जेस, हॉलमार्क शुल्क आणि 3 टक्के जीएसटीचा समावेश नाही. नागपूर सराफा असोसिएशननुसार मेकिंग चार्जेस किमान 13 टक्क्यांपासून पुढे असतील.