Gold rates: सोने-चांदी झाली स्वस्त! ग्राहकांना मोठा दिलासा, पाहा आजचे ताजे भाव

आगामी काळातही आंतरराष्ट्रीय परिस्थितीनुसार या दरांमध्ये चढ-उतार कायम राहतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
वाचा
Summary is AI-generated, newsroom-reviewed
  • जागतिक बाजारातील बदलांमुळे देशांतर्गत सोन्या आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे
  • आज सोन्याचा दर १,५६,००० रुपये असून ३ टक्के जीएसटीसह ग्राहकांना १,६०,६८० रुपये मोजावे लागत आहेत
  • चांदीचा प्रति किलो दर २,६८,००० रुपयांवर स्थिरावला असून जीएसटीसह हा दर २,७६,४०० रुपयांपर्यंत वाढला आहे
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.
जळगाव:

जागतिक बाजारातील घडामोडी आणि आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्थेतील बदलांमुळे आज देशांतर्गत बाजारात सोन्या आणि चांदीच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळाली आहे. सराफा बाजारातून मिळालेल्या ताज्या माहितीनुसार, आज सोन्याच्या दरात 700 रुपयांची तर चांदीच्या दरात तब्बल 5000 रुपयांची मोठी कपात झाली आहे. जागतिक पातळीवर डॉलरच्या मूल्यात होणारे बदल आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचा हा थेट परिणाम असल्याचे बाजार तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

या घसरणीनंतर आज सोन्याचा भाव 1,56,000 रुपयांवर आला असून, 3% जीएसटीसह ग्राहकांना यासाठी 1,60,680 रुपये मोजावे लागत आहेत. दुसरीकडे, चांदीच्या दरात झालेली 5000 रुपयांची घसरण ही गुंतवणूकदारांसाठी लक्षवेधी ठरली आहे. आज चांदीचा प्रति किलोचा दर 2,68,000 रुपयांवर स्थिरावला आहे, तर जीएसटीसह हा दर 2,76,400 रुपयांवर पोहोचला आहे. दरम्यान, आज सकाळी 11.30 वाजेपर्यंत बाजारात आणखी काही प्रमाणात घसरण होण्याची शक्यताही व्यापाऱ्यांनी वर्तवली होती.

Advertisement

नक्की वाचा - थेट RBIच्या तिजोरीवरच डल्ला! कचऱ्याचा डबा, 98 दिवसांचे गूढ मौन अन् आजारपणाची मोठी सुटी; असा रचला चोरीचा गेम

सराफा व्यावसायिकांनी दिलेल्या माहितीनुसार, जागतिक अर्थव्यवस्थेतील अनिश्चितता, आंतरराष्ट्रीय बाजारातील मागणी-पुरवठ्यातील चढ-उतार आणि डॉलरच्या मूल्यात होणारे बदल यांमुळे मौल्यवान धातूंच्या किमतीवर दबाव निर्माण झाला आहे. डॉलर मजबूत झाल्याने जागतिक बाजारात सोन्या-चांदीची विक्री वाढली असून, त्याचा फटका दरांना बसला आहे. आगामी काळातही आंतरराष्ट्रीय परिस्थितीनुसार या दरांमध्ये चढ-उतार कायम राहतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

नक्की वाचा - Bakrid Bank Holiday 2026: 27 मे की 28 मे? बकरीदनिमित्त तुमच्या शहरात बँक कधी राहणार बंद? लगेच दूर करा संभ्रम

सोन्या-चांदीच्या खरेदीचा विचार करणाऱ्यांसाठी आज एक अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी आहे. गेल्या काही दिवसांपासून गगनाला भिडलेल्या सोन्या-चांदीच्या दरांना आज अचानक ब्रेक लागला असून बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली. आज सोन्याचे भाव 700 रुपयांनी उतरले आहेत, तर चांदीने ग्राहकांना मोठा झटका देत तब्बल 5000 रुपयांची मोठी गटांगळी खाल्ली आहे. या घसरणीमुळे सराफा बाजारात ग्राहकांची पावले वळण्याची शक्यता आहे.
 

Advertisement
Topics mentioned in this article