Gondia News: 10 दिवसांच्या बाळाची विक्री.. आरोपी डॉक्टरचा आत्महत्येचा प्रयत्न, ब्लेडने वार केले अन्...

पोलिसांकडून शोध सुरु असतानाच या डॉक्टरने ब्लेडच्या साहाय्याने स्वतःच्या पोटावर वार केले. या प्रकरणाने एकच खळबळ उडाली. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins

अभय भुते, गोंदिया

Gondia Crime: बाळाच्या विक्री करणाऱ्या डॉक्टरने स्वतःवर प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना गोंदियामधून समोर आली आहे.  नितेश वाजपेयी असं या डॉक्टरचे नाव आहे. बाळाच्या विक्री प्रकरणाच्या गुन्ह्यात पोलिसांकडून शोध सुरु असतानाच या डॉक्टरने ब्लेडच्या साहाय्याने स्वतःच्या पोटावर वार केले. या प्रकरणाने एकच खळबळ उडाली. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

नेमकं काय घडलं? 

समोर आलेल्या माहितीनुसार,  दहा दिवसांच्या बाळाच्या विक्री प्रकरणात भंडारा जिल्ह्यातील वरठी पोलीस स्टेशन येथे दिनांक 6 फेब्रुवारी 2026 रोजी, भंडारा जिल्हा बाल विकास च्या वतीने तक्रार दाखल करण्यात आली होती.  या प्रकरणात भंडारा पोलीस मुख्य सूत्रधार आरोपी डॉक्टरच्या मागावर होते, मात्र डॉ नितेश वाजपेयी व त्याचे 3 साथीदार हे पोलिसांच्या हातात लागत नव्हते.

Holi Special Train: होळीला गावी जाताय? मध्य रेल्वेकडून मोठं गिफ्ट, 1448 विशेष ट्रेन धावणार; पाहा वेळापत्रक

मात्र संध्याकाळच्या सुमारास डॉक्टरने बालाघाट कटनी येथून स्वतःच्या  खाजगी चारचाकी वाहनाने निघून भंडाऱ्याच्या दिशेने येत असताना गोबरवाहीच्या रस्त्याच्या कडेला लघुशंकाच्या नावाने गाडी थांबवून स्वतःच्या पोटावर ब्लेडने वार करत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर त्याच्या ड्रायव्हरने डॉक्टरला तुमसर येथील सुभाषचंद्र बोस उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले, त्यावर तत्काळ उपचार करून, भंडारा येथील एका खाजगी रुग्णालयात  डॉक्टरला दाखल करण्यात आले असून  त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

सध्या डॉ नितेश वाजपेयी याला पोलिसांकडून अटक करण्यात आली नाही.  मात्र या प्रकरणात आणखी एका आरोपीच्या नावाने वाढ करण्यात आली आहे. सध्या या संपूर्ण प्रकरणात आरोपीची संख्या आता 6 झाली आहे. त्यापैकी एक महिला लल्लेश्वरी सादेपाच, सागर सिक्का रा. गोंदिया यांना अटक करण्यात आली आहे तर रुग्ण डॉ. नितेश वाजपेयी , मालती प्रकाश वाघमारे, पोर्णिमा सतीश धुर्वे, उमेशसिंग रामचंद्र सिंग गहलोत रा. गोंदिया हे आरोपी अद्यापही फरार आहेत. या संपूर्ण प्रकरणामुळे जिल्ह्यात मोठी खडबड उडाली असून या टोळीमध्ये आणखी किती मोठे मासे पोलिसांच्या गळ्याला लागणार हे पाहण्यासारखे आहे.

Advertisement

Ulhasnagar News :उल्हासनगरच्या भर चौकातून उचलले अन् माथेरानच्या लॉजवर नग्न करून अमानुष छळ! कारण काय?

Topics mentioned in this article