अभय भुटे, गोंदिया:
Gondia Leopard Attack: गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. पुणे, रायगड, गोंदिया जिल्ह्यामध्ये बिबट्याचा वावर वाढला असून नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पाहायला मिळत आहे. अशातच गोंदिया जिल्ह्यामध्ये बिबट्याने एका चार वर्षीय चिमुकल्याचा जीव घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बिबट्याने घरातून चिमुकल्याला उचलून नेत्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पाहायला मिळत असून प्रशासनाविरुद्ध संतापाची लाट उसळली आहे.
डोळ्यादेखत चिमुकल्याला उचलून नेलं...
याबाबत सविस्तर माहिती अशी की, गोंदिया जिल्ह्याच्या तिरोडा तालुक्यातील खडकी गावात आज सकाळी 8 वाजेला बिबट्याने एका चार वर्षाच्या चिमुकल्यावर हल्ला करत घरातून उचलून नेत. आई-वडिलांसोबत चिमुकला बसला होता त्याचवेळी बिबट्याने हल्ला करीत आई-वडिलांच्या डोळ्यादेखत उचलून नेलं त्यात चिमुकल्याचा दुर्दैवी अंत झाला आहे.
गावकरी बिबट्याच्या मागे धावले असताना बिबट्याने मुलाला रस्त्यावर सोडून दिलं पण तो पर्यंत मुलाचा मृत्यू झाला होता. या घटनेमुळे गावकऱ्यांमध्ये रोष पाहायला मिळत आहे. हियांश शिवशंकर रहांगडाले (वय ४) असे या चिमुकल्याचे नाव आहे. सकाळी सात वाजण्याच्या सुमारास हियांश आपल्या आई- वडिलांसोबत घराच्या मागील बाजूस चुलीजवळ बसला होता.
आई वडिलांचा आक्रोश
याचवेळी दबा धरुन बसलेल्या बिबट्याने त्याच्यावर हल्ला चढवला. हा प्रकार पाहताच लोकांनी आरडाओरडा केला. लोकांच्या ओरडण्याने बिबट्याने मुलाला रस्त्यावर टाकून पळ काढला. चार वर्षांच्या मुलाचा डोळ्यादेखत जीव गेल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. हियांशच्या आई- वडिलांचा काळीज पिळवटणारा आक्रोश पाहून गावकरीही हळहळ व्यक्त करत आहेत. दरम्यान, या घटनेनंतर प्रशासनाविरुद्ध संताप व्यक्त केला जात असून त्याला दिसताच क्षणी मारुन टाका, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.
Beed Crime: बीडमध्ये ATSची मोठी कारवाई! दोघांना उचललं; बनावट ट्रस्ट अन् कोट्यवधींचा घोटाळा उघड