जाहिरात

Beed Crime: बीडमध्ये ATSची मोठी कारवाई! दोघांना उचललं; बनावट ट्रस्ट अन् कोट्यवधींचा घोटाळा उघड

दुसऱ्याच संस्थेचा नोंदणी क्रमांक स्वतःचा असल्याचे भासवून बँकेची दिशाभूल केली. इतकेच नव्हे, तर नीती आयोगा च्या दर्पण पोर्टलवर नोंदणी करतानाही बनावट क्रमांक नोंदवल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. 

Beed Crime: बीडमध्ये ATSची मोठी कारवाई! दोघांना उचललं; बनावट ट्रस्ट अन् कोट्यवधींचा घोटाळा उघड

आकाश सावंत, बीड:

Beed ATS Raid: धार्मिक कार्याचा बुरखा ओढून जनतेकडून कोट्यवधींचा निधी गोळा करणाऱ्या आणि बनावट कागदपत्रांच्या आधारे बँकांसह आयकर विभागाची फसवणूक करणाऱ्या गुलजार-ए-रझा या बोगस ट्रस्टचा पर्दाफाश झाला आहे. दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएसने ) केलेल्या सखोल चौकशीत या ट्रस्टने तब्बल 4 कोटी 73 लाख 67 हजार 503 रुपयांचा निधी हडपल्याचे समोर आले आहे.

बीडमध्ये एटीएसची मोठी कारवाई...

याप्रकरणी एटीएसने पथकाचे पोलीस कॉन्स्टेबल मोहम्मद मोहसीन शेख यांच्या फिर्यादीवरून चार विश्वस्तांविरुद्ध बीडच्या माजलगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून चार जणांना  या पथकाने अटक केली आहे. दहशतवाद विरोधी पथकाचे संभाजीनगर युनिट बीड जिल्ह्यातील विविध एनजीओ आणि ट्रस्टची नियमित पडताळणी करत असताना गुलजार-ए-रझा ही संस्था संशयाच्या भोऱ्यात आली.

Sanjay Raut: राऊत- शिंदे आमने-सामने!, शिंदेंनी हात जोडले, त्यानंतर राऊतांनी जे केलं त्याची सगळीकडेच चर्चा

या संस्थेची वेबसाईट आणि सोशल मीडियावरील माहितीनुसार, ही संस्था धार्मिक कार्यासाठी देणग्या गोळा करत होती. मात्र, तांत्रिक तपास केला असता धक्कादायक वास्तव समोर आले. या ट्रस्टने अ‍ॅक्सिस बँकेच्या लातूर शाखेत ५ खाती उघडली होती. त्यासाठी त्यांनी वक्फ बोर्ड, अहिल्यानगर येथील फैजान-ए-कन्झुल इमान या दुसऱ्याच संस्थेचा नोंदणी क्रमांक स्वतःचा असल्याचे भासवून बँकेची दिशाभूल केली. इतकेच नव्हे, तर नीती आयोगा च्या दर्पण पोर्टलवर नोंदणी करतानाही बनावट क्रमांक नोंदवल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. 

 आयकर विभागाचीही फसवणूक 

विश्वस्तांनी ट्रस्टची केवळ डीड  नोंदणी केली होती, परंतु महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम १९५० नुसार धर्मादाय आयुक्तांकडे कोणतीही रीतसर नोंदणी केली नव्हती. असे असतानाही केवळ डीडच्या कागदपत्रांना नोंदणी प्रमाणपत्र भासवून आयकर विभागाकडून पॅन कार्ड मिळवले आणि करचोरीच्या उद्देशाने बँकेचे बनावट विवरणपत्र (स्टेटमेंट) सादर केले.

नक्की वाचा - Akola News: ‘एक घर – दोन उमेदवार' यंदाच्या निवडणुकीतला नवा ट्रेंड जोरात, काय आहे गणित?

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com