जाहिरात

Gondia News: निर्दयी आई! अवघ्या 20 दिवसाच्या बाळाला नदीत फेकलं, तिने असं का केलं? संतापजनक कारण समोर

बाळामुळे घरीच अडकून रहावे लागेल, नोकरी करता येणार नाही. त्यामुळे मुल झाल्यानंतर मी मुलाला संपविण्याचे कट रचला.

Gondia News: निर्दयी आई! अवघ्या 20 दिवसाच्या बाळाला नदीत फेकलं, तिने असं का केलं? संतापजनक कारण समोर

अभय भुते, गोंदिया

Gondia News: गोंदियाच्या रावणवाडी पोलिस ठाण्यांतर्गत डांगुर्ली  20 दिवसाचे बाळ चोरीस गेल्याचे प्रकरण उघडकीस आले. या प्रकरणाने एकच खळबळ माजली. दरम्यान जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या आदेशान्वये रावणवाडी पोलिसांनी तपासाला गती दिली. १९ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र-मध्यप्रदेशला जोडणाऱ्या वाघनदीच्या पात्रात त्या बाळाचा मृतदेह आढळून आला. धक्कादायक बाब म्हणजे पोलिस तपासात आईनेच बाळाला नदीपात्रात टाकल्याचे समोर आले.

समोर आलेल्या माहितीनुसार,  गोंदिया जिल्ह्याच्या डांगुर्ली येथील रिया राजेंद्रसिंह फाये यांनी २० दिवसापुर्वी बाळाला जन्म दिला. दरम्यान १७ नोव्हेंबर रोजी रात्री दहा वाजेदरम्यान मुलाची आई शौचालयास जाण्याच्या निमित्ताने बाहेर पडली व काही मिनिटात परत येताच वीस दिवसाचा बालक बेपत्ता झाल्याची घटना घडली. या घटनेची माहिती महिलेने आपल्या पतीला तसेच नातेवाईकांना दिली.

Ratnagiri News : सेवानिवृत्त शिक्षकांच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर तो मेसेज अन् शिक्षकांचे लाखो रुपये गायब

लगेच आजूबाजूच्या परिसरात शोधून देखील बाळ न मिळाल्यामुळे पोलीस स्टेशन रावणवाडी पोलिस स्टेशन येथे तक्रार दाखल करण्यात आली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला. बाळाचा मृत्यू देह गावाजलीच नदीपात्र आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. पोलिसांनी घरच्या लोकांना विचारपूस केली असता बाळाच्या आईनेच मुलाला संपविला असं तपासात पुढे आले.  

रियाचे लग्न राजेंद्रसिंह फाये यांच्याशी झाले होते. लग्नानंतर रियाला नोकरी करायची होती. त्यामुळे तिलाबाळ पाहिजे नव्हते. अशातच रियाला दिवस गेल्याने पतीने तिला गर्भपात करू दिला नाही. व २० दिवसापूर्वी बाळ जन्माला आले. बाळामुळे घरीच अडकून रहावे लागेल, नोकरी करता येणार नाही. त्यामुळे मुल झाल्यानंतर मी मुलाला संपविण्याचे कट रचला.

पाणी भरण्यावरून भांडण झालं, भडकलेल्या महिलेने डासांचा स्प्रे तोंडावर मारला; शेजाऱ्याचा मृत्यू

त्यातुनच १७ नोव्हेंबर रोजी डाव साधून मध्यरात्री बाळाला घराजवळ असलेल्या नदीपात्रत टाकून दिल्याचे तिले कबुल केले. यावरून तिच्या विरुद्ध रावणवाडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com