देवा राखुंडे, प्रतिनिधी
पुणे, सोलापूर आणि अहिल्यानगर जिल्ह्यासाठी जीवनदायिनी ठरलेलं उजनी धरण आज सकाळी सहाच्या आकडेवारी नुसार 100 टक्के क्षमतेने भरलं आहे. उजनी धरणार एकूण पाणी साठवण क्षमतेच्या 116 पूर्णांक 99 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. ज्यावेळी उजनी धरणात 117 टीएमसी पाणीसाठा होता त्यावेळी ते शंभर टक्के क्षमतेने भरलं जातं.आज उजनीत 116 पूर्णांक 99 टीएमसी पाणीसाठा झाला आहे.
या उजनी धरणावर पुणे जिल्ह्यातील लाखो हेक्टर शेती, सोलापूर शहराचा पाणी पुरवठा केला जातो. याचा सोलापूर जिल्ह्यातील बहुतांश साखर कारखाने आणि शेती तर लहान मोठ्या शेकडो पाणी उपसा सिंचन योजनांसह नगर जिल्ह्यातील औद्योगिक वसाहत अवलंबून आहे. त्यामुळे उजनी पूर्ण क्षमतेने कधी भरणार याकडे सर्वांची नजर लागलेली असते. पूर्ण क्षमतेने उजनी भरण्यासाठी 5 टीएमसी पाण्याची आवश्यकता असणार आहे.