GMLR Road: मुंबईतील पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणाऱ्या महत्वाकांक्षी गोरेगाव - मुलुंड जोड रस्ता प्रकल्पाअंतर्गत (Goregaon-Mulund Link Road) बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून जाणाऱ्या जुळ्या बोगद्याच्या बांधणीला आता गती मिळणार आहे. प्रत्येकी 4.7 किलोमीटर अंतराच्या आणि 45.70 मीटर रुंदीच्या जुळ्या बोगद्यासाठी आवश्यक असलेली 19.43 हेक्टर वनजमीन बृहन्मुंबई महानगरपालिकेकडे वळती करण्यास केंद्रीय पर्यावरण, वन व वातावरणीय बदल मंत्रालय (MoEF&CC) यांची अंतिम मान्यता मिळाली आहे. त्यानुसार, अटी व शर्तींचे अनुपालन तसेच पूर्ततेची कार्यवाही बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी दिली आहे. हा प्रकल्प केवळ वाहतुकीसाठीच नव्हे, तर महानगराच्या समतोल विकासासाठीही एक मैलाचा दगड ठरेल, असा विश्वास बांगर यांनी व्यक्त केला आहे.
( नक्की वाचा : गोळ्या दिल्या, दारू पाजली; मुंबईतील बड्या शाळेच्या वासनांध शिक्षिकेचे भयंकर कृत्य )
75 मिनिटांचा प्रवास अवघ्या 25 मिनिटांत
गोरेगाव-मुलुंड लिंक रोड हा सुमारे 12.20 किलोमीटर लांबीचा मार्ग असून, हा प्रकल्प एकूण चार टप्प्यांमध्ये राबविला जात आहे. या संपूर्ण प्रकल्पामुळे पूर्व आणि पश्चिम उपनगरांदरम्यान प्रवासाची वेळ 75 मिनिटांवरुन 25 मिनिटांवर येईल असा दावा करण्यात आला आहे. यामुळे मुंबईकरांच्या प्रवास वेळेत आणि इंधनाची बचत होईल असे महापालिका प्रशासनाचे म्हणणे आहे.
( नक्की वाचा: जेवणाची होम डिलिव्हरी देणाऱ्या कंपन्यांची तक्रार करण्यासाठी आता लवकरच टोल फ्री क्रमांक )
पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणारा हा एक आणखी एक महत्त्वाचा मार्ग ठरणार आहे. जोगेश्वरी - विक्रोळी जोडरस्त्याच्या (JVLR) तुलनेत या नवीन जोडरस्त्यामुळे प्रवासाचे अंतर सुमारे 8.80 किलोमीटरने कमी होईल असे सांगण्यात आले आहे.
SNGP खालून जुळ्या बोगद्यांची निर्मिती करणार
पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणारा हा एक आणखी एक महत्त्वाचा मार्ग ठरणार आहे. जोगेश्वरी - विक्रोळी जोडरस्त्याच्या (JVLR) तुलनेत या नवीन जोडरस्त्यामुळे प्रवासाचे अंतर सुमारे 8.80 किलोमीटरने कमी होईल असे सांगण्यात आले आहे. गोरेगाव - मुलुंड जोड रस्ता प्रकल्पाच्या टप्पा 3(A) अंतर्गत उड्डाणपूल, एलिव्हेटेड रोटरीचे बांधकाम तर, टप्पा 3 (B) मध्ये गोरेगांव येथील दादासाहेब फाळके चित्रनगरी येथे 1.22 किलोमीटर लांबीचा तिहेरी मार्गिका असलेला पेटी बोगदा (कट अँड कव्हर) तसेच बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून प्रत्येकी 4.7 किलोमीटर अंतराच्या आणि 45.70 मीटर रुंदीच्या जुळ्या बोगद्याची निर्मिती केली जाणार आहे. जोड मार्ग आणि अन्य बाबींसह तिसऱ्या टप्प्यातील मार्गाची एकूण लांबी 6.65 किलोमीटर आहे.
( नक्की वाचा: मुंबई कोस्टल रोडबाबत मोठी बातमी, 'या' गोष्टीला आता मिळाली मान्यता )
जुळ्या बोगद्यासाठी महत्त्वाची होती वनखात्याची परवागी
जुळा बोगदा प्रकल्पासाठी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या जमिनीखालून बोगद्याचे बांधकाम होणे प्रस्तावित आहे. या प्रस्तावास केंद्र सरकारची पूर्वमंजुरी मिळवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने विनंती केली होती. या प्रस्तावाचे काटेकोरपणे परीक्षण केल्यानंतर, केंद्रीय पर्यावरण, वन व वातावरणीय बदल मंत्रालय (MoEF&CC) यांच्याकडून दिनांक 2 जानेवारी 2024 रोजी तत्वत: मान्यता (In-Principle) मिळाली. तर, दिनांक 1 जुलै 2025 रोजी वन (संरक्षण व संवर्धन) अधिनियम, 1980 च्या कलम 2 अंतर्गत बोगद्याच्या उभारणीसाठी 19.43 हेक्टर राखीव वनक्षेत्र बृहन्मुंबई महानगरपालिकेकडे वळती करण्यास केंद्रीय पर्यावरण, वन व वातावरणीय बदल मंत्रालय यांच्याकडून अंतिम मंजुरी प्राप्त झाली आहे. त्यानुसार, अटी व शर्तींचे अनुपालन व पूर्ततेची कार्यवाही बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत सुरू करण्यात आली आहे.
वन खात्याने ही जमीन या प्रकल्पासाठी दिली असली, तरी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील वन जमिनीचा कायदेशीर दर्जा वने म्हणूनच कायम राहणार आहे. हे राष्ट्रीय उद्यान हद्द सुरु होण्यापूर्वी हा बोगदा जमिनीच्या पोटात जाईल आणि उद्यानाची हद्द संपल्यानंतर जमिनीच्या बाहेर येईल. प्रकल्पासाठी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामधील कोणतीही झाडे / जमीन थेट बाधित होणार नाही. तसेच राज्य शासनाने सुचविलेल्या सर्व पर्यावरणीय उपाययोजनांची अंमलबजावणी केली जाणार आहे.
जुळ्या बोगद्यासाठी महत्त्वाची होती वनखात्याची परवानगी