जाहिरात

Gudi Padwa 2026: डॉ अपर्णा बांदोडकरला अशी मिळाली बुलेट राणी म्हणून ओळख, यंदाच्या सरप्राइज लुककडे सर्वांचं लक्ष

Gudi Padwa 2026: 'बुलेट राणी' डॉ. अपर्णा बांदोडकरचा गिरगावच्या शोभायात्रेतील वर्ष 2013पासूनचा थक्क करणारा प्रवास. यंदा 2026च्या गुढीपाडव्याला कसा असणार लुक?

Gudi Padwa 2026: डॉ अपर्णा बांदोडकरला अशी मिळाली बुलेट राणी म्हणून ओळख, यंदाच्या सरप्राइज लुककडे सर्वांचं लक्ष
"Gudi Padwa 2026: बुलेटराणीचा यंदा कसा असणार लुक?"

Gudi Padwa 2026: गुढीपाडवा आणि गिरगावची शोभायात्रा हे समीकरण आता अतूट झाले आहे. या यात्रेत सर्वांचे लक्ष वेधून घेणारे एक व्यक्तिमत्व म्हणजे 'बुलेट राणी' म्हणून ओळखली जाणारी डॉ. अपर्णा बांदोडकर. वर्ष 2013 पासून बुलेटवरून आपली संस्कृती आणि परंपरेचा वारसा जपत त्यांनी एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. यंदा वर्ष 2026 मध्ये त्या कोणत्या विशेष लुकमध्ये दिसणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

वर्ष 2013: संकल्पातून सुरू झाला 'बुलेट' प्रवास 

डॉ. अपर्णाने सांगितले की, सुरुवातीला कोणतीही मोठी संकल्पना नव्हती. वर्तमानपत्रात बाइक रॅलीचे फोटो पाहून आकर्षण वाटायचे. "ज्या दिवशी स्वतःच्या कमाईने बुलेट घेईन, त्याच दिवशी गिरगावच्या रॅलीत सहभागी होईन," असा निश्चय त्यांनी केला होता. वर्ष 2013मध्ये त्यांचा हा संकल्प पूर्ण झाला. त्यावर्षी ऐनवेळी फुटवेअर तुटल्याने त्यांनी शूज घातले आणि तोच लुक पुढे त्यांची ओळख बनला.

वर्ष 2014: जाहिरातीमुळे मिळाली 'फेटा' फॅशनला नवी दिशा 

वर्ष 2014 मध्ये त्यांनी आपल्या 'बिजली' (बुलेट) वर फुलांची सजावट करण्यास सुरुवात केली. यावर्षी लग्नाची साडी नेसली होती. या लुकमुळे एका मोठ्या चॅनेलची जाहिरात मिळाली आणि यानिमित्ताने मी घराघरात पोहोचले.

(नक्की वाचा: Gudi Padwa 2026: गुढीपाडव्याला आवडते कलाकार येणार तुमच्या भेटीला ठरणार, गिरगावच्या शोभायात्रेत कोणकोण होणार सहभागी? वाचा यादी)

वर्ष 2015 : फेट्याचा लुक 
Latest and Breaking News on NDTV

Photo Credit: Dr. Aparna Bandodkar Instagram

वर्ष 2016 आणि वर्ष 2017: इतिहासाला मानवंदना: ढाल-तलवार ते मावळा टोपी  

वर्ष 2016 मध्ये बुलेटवर एक ढाल आणि तलवार ठेवली होती. यावेळेस केवळ मी बुलेटची सजावट केली होती. तर वर्ष 2017मध्ये 'मावळा टोपी' परिधान करून छत्रपती शिवाजी महाराज यांना आपला लुक समर्पित केला होता.  

क्रांतिकारकांचा वारसा: झाशीची राणी आणि महादजी शिंदे (वर्ष 2018 आणि वर्ष 2019) 

2018च्या लुकबाबत बुलेट राणी म्हणाली की,  वर्ष 2018 मध्ये युवा पिढीला इतिहासाची माहिती व्हावी या उद्देशाने मी 'झाशीची राणी' वेशभूषा साकारली होती. तर वर्ष 2019मध्ये शिंदेशाही पगडी घालून आणि पैठणी नेसून महादजी शिंदे यांच्या कर्तृत्वाला मानवंदना दिली. ही विशेष पगडी पुण्याहून तयार करून घेतली होती, इंदुरमध्ये आजही अशा प्रकारच्या पगडी तयार केल्या जातात. बुलेटलाही मोरपंखांनी सजावट केली होती. 

झाशीची राणी लुक 

वर्ष 2024:  अहिल्याबाई होळकरांचा तेजस्वी लुक  

सर्वात चर्चित लुक म्हणजे महाराणी अहिल्याबाई होळकर यांचा. यासाठी तिने विशेष तयारी केली होती:
साडी: माहेश्वर सिल्क साडी.
साहित्य: उज्जैनहून मागवलेला डमरू आणि राजकोटहून तयार करून घेतलेले त्रिशूळ.
सजावट: बुलेटवर डमरूंची सजावट आणि पुण्याहून तयार करून घेतलेले खास शिवलिंग.

वर्ष 2026 मध्ये काय असेल खास?

यंदाच्या म्हणजेच 2026 च्या गुढीपाडव्यासाठी डॉ. अपर्णा बांदोडकरने गुप्तता पाळली असली, तरी यंदाचा लुक एका विशेष 'संकल्पनेवर' आधारित असल्याचे तिने सांगितले आहे. गिरगावकर आणि तिचे चाहते यंदाच्या या सरप्राइज लुकसाठी अत्यंत आतुर आहेत.

Listen to the latest songs, only on JioSaavn.com