Gudi Padwa 2026: गुढीपाडवा म्हणजे मराठी नववर्षाची सुरुवात. गुढीपाडव्या दिवशी गिरगावात निघणारी शोभायात्रा म्हणजे आपल्या मराठी संस्कृतीचा वैभवाचा कळस. यंदाची ही शोभायात्रा अधिकच खास ठरणार आहे, कारण महाराष्ट्राचे लाडके कलाकार या उत्सवात सहभागी होणार आहेत. स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिकांचे कलाकार यंदा स्वामी विवेकानंद युवा प्रतिष्ठान आणि गिरगाव ध्वजपथक यांच्यासोबत गुढीपाडवा साजरा करणार आहेत.
कलाकारांच्या उपस्थितीने गिरगाव उजळणार
यंदा 19 मार्च रोजी गुढीपाडवा आहे. यानिमित्ताने गिरगावच्या शोभायात्रेत सकाळी 9 वाजता मराठी सिनेसृष्टीतील आणि टेलिव्हिजनवरील दिग्गज कलाकार हजेरी लावणार आहेत. यामध्ये आदिनाथ कोठारे, रुपाली भोसले, सोनाली खरे, विजय आंदळकर आणि विवेक सांगळे यासारख्या कलाकारांचा समावेश आहे. तसेच प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारे मृणाल दुसानिस, पूजा बिरारी, विशाल निकम, माधवी निमकर, समृद्धी केळकर, अभिषेक रहाळकर, रेश्मा शिंदे आणि सुमीत पुसावळे हे कलाकारही पारंपारिक थाटात यात्रेत सामील होतील.
सर्व कलाकार या ऐतिहासिक शोभायात्रेचा भाग होऊन चाहत्यांसोबत नववर्षाचे स्वागत करतील. मुंबईची ही पारंपरिक शोभायात्रा नेहमीच शिस्त आणि भव्यतेसाठी ओळखली जाते. त्यात आता छोट्या पडद्यावरील आवडत्या कलाकारांची भर पडल्याने हा सोहळा डोळ्यांचे पारणे फेडणारा ठरेल यात शंका नाही.
(नक्की वाचा: Bhumi Pednekar Paithani Saree: कपाळी चंद्रकोर अन् नाकात नथ! भूमी पेडणेकरच्या पैठणी लुकने चाहत्यांना घातली भुरळ)
कोणत्या मालिकेतील कोणकोणते कलाकार गिरगावच्या शोभायात्रेत सहभागी होणार आहेत?
'नशीबवान' मालिका
- आदिनाथ कोठारे
- रुपाली भोसले
- सोनाली खरे
- नेहा नाईक
'लग्नानंतर होईलच प्रेम' मालिका
- विजय आंदळकर
- विवेक सांगळे
- मृणाल दुसानिस
'येड लागलं प्रेमाचं' मालिका
- पूजा बिरारी
- विशाल निकम
'हळद रुसली कुंकू हसलं' मालिका
- समृद्धी केळकर
- अभिषेक रहाळकर
'घरोघरी मातीच्या चुली' मालिका
- रेश्मा शिंदे
- सुमीत पुसावळे
'लपंडाव' मालिका
- कृतिका देव
- चेतन वडनेरे
'तुझ्या सोबतीने' मालिका
- एतशा संझगिरी
- अजिंक्य ननावरे
- माधवी निमकर
'तूही रे माझा मितवा' मालिका
- शर्वरी जोग
- अभिजीत आमकर
'वचन दिले तू मला' मालिका
- अनुष्का सरकटे
- इंद्रनील कामत
- मिलिंद गवळी
'आनंदी' मालिका
- जाई खांडेकर
- समीर धर्माधिकारी
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world