5 days ago

आज गुढीपाडवा आणि नवीन वर्षानिमित्त राज्यभरात उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे. डोंबिवली, ठाणे, गिरगाव आणि पुण्यात शोभा यात्रेबद्दल आकर्षण असतं. लवकरच तरुणी नटुनथटून, बाईकवरुन शोभायात्रेत सामील होतात. तर अनेक जणं विशिष्ट थीम तयार करून शोभायात्रेत सहभागी होत आहे.  

Mar 30, 2025 22:41 (IST)

Maharashtra Kesari 2025: सोलापूरचा वेताळ शेळके महाराष्ट्र केसरी, पृथ्वीराज पाटीलला आस्मान दाखवलं

महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या वतीने अहिल्यानगरमध्ये 66 व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. आमदार रोहित पवार मित्र मंडळ आणि अहिल्यानगर जिल्हा तालीम संघाच्या वतीने ही स्पर्धा पार पडली. या स्पर्धेमध्ये वेताळ शेळके विरुद्ध  पृथ्वीराज पाटील यांच्यामध्ये फायनल झाले. या लढतीत सोलापूरच्या वेताळ शेळकेने पृथ्वीराजचा पराभव करत महाराष्ट्र केसरीच्या गदेवर आपले नाव कोरले. 

Mar 30, 2025 20:22 (IST)

LIVE Update: राज ठाकरेंचा पुन्हा एकदा लाव रे तो व्हिडिओ.. गंगा प्रदूषणावरुन टीकास्त्र

ज्या नद्यांकडे आपल्या राज्यकर्त्यांचा.. गंगा साफ करावी अशी बोलणारी पहिली व्यक्ती म्हणजे 

राजीव गांधी. तेव्हापासून अजून गंगा साफ करतच आहेत. त्यानंतर नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले.आपल्याकडच्या नद्यांची अवस्था आहे

तिथले पाणी पिऊ शकत नाही..

Mar 30, 2025 19:32 (IST)

Latur News: लातूरच्या करकट्टा इथ अनैतिक संबंधातून युवकाची हत्या

लातूरच्या करकट्टा इथ अनैतिक संबंधातून एक 32 वर्षीय युवकाची कोयत्याने वार करून हत्या करण्यात आलीय..शरद प्रल्हाद इंगळे वय 32 वर्ष अस मयत युवकाच नाव आहे. शरद इंगळे याचे गावातील एका विवाहित महिलेसोबत अनैतिक संबंध होते. दरम्यान महिलेच्या मुलाला आईचे गावातील एका तरुणासोबत अनैतिक संबंध असल्याचे माहिती झाल्यानंतर संतापलेल्या मुलाने करकट्टा माटेफळ भर रस्त्यात कोयत्याने वार करून युवकाची हत्या केलीय... हत्या केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झालेला आहे. फरार आरोपीचा शोध मुरुड पोलीस घेत आहेत.. दरम्यान जोपर्यंत आरोपीला अटक करत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा नातेवाईकांनी घेतला आहे..

Mar 30, 2025 18:27 (IST)

Pune Fire News: पुण्यात अग्नितांडव! के के मार्केटमधील हॉटेलला आग, एकाचा मृत्यू

पुण्यातील धनकवडी मध्ये आगीची घटना 

धनकवडी मधील के के मार्केट मध्ये असलेल्या हॉटेल साईबाला भीषण आग 

आगीत एका कामगाराचा दुर्दैवी मृत्यू

सिलेंडर फुटल्याने आग लागल्याची प्राथमिक माहिती 

हॉटेल शेजारी दोन दुकानांमध्ये देखील आगीच्या झळा 

अग्निशमन दलाकडून आग आटोक्यात 

आगीत तीन दुकानांचे मोठं नुकसान

Advertisement
Mar 30, 2025 17:52 (IST)

Mumbai News: 'टायगर अभी जिंदा है...', सेना भवनासमोर मनसेची बॅनरबाजी

 शिवसेना भवन बाहेर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून टायगर अभी जिंदा है अशा आशियाचं बॅनर लावण्यात आलंय. गुढीपाडवा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर मनसे कडून या परिसरामध्ये मोठी बॅनरबाजी करण्यात आली आहे. मात्र या ठिकाणी लावण्यात आलेलं हे बॅनर सर्वांचं लक्ष वेधून घेते. विधानसभा निवडणुकीमध्ये अपेक्षित यश न मिळू शकल्याने ठाकरे गटाकडून राज ठाकरेंवर अनेकदा टीका केली गेली आणि याच टीकेला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न या बॅनरच्या माध्यमातून केला जातोय. 

Mar 30, 2025 15:47 (IST)

Palghar News: पालघर मनसेतील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर

 पालघर मधील मनसेतील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर . मनसैनिकांना गुढीपाडवा मेळाव्यासाठी आव्हान करणाऱ्या बॅनर वरील मनसे नेते अविनाश जाधव यांच्या मुकुट पेट्रोलपंप आणि खैरा फाटक सिग्नल परिसरातील बॅनर वरील फोटोला फासलं काळ.  पालघरच्या बोईसर मधील ओसवाल परिसर, मुकुट पेट्रोल पंप लागलेल्या बॅनर वरील फोटोला काळं फासलं . पालघर मधील मनसे पदाधिकाऱ्यांनीच काळ फासल्याची माहिती . 

Advertisement
Mar 30, 2025 15:46 (IST)

Nagpur News: नागपूर जिल्हा बँकेवर महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे संस्थापक प्रशासक म्हणून नियुक्ती

नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे संस्थापक प्रशासक म्हणून नियुक्ती...

काँग्रेसचे माजी नेते सुनील केदार यांच्यावर १५३ कोटी रुपयांचा घोटाळा केल्यान शिक्षा सुनावण्यात आली आहे.. त्यामुळे नागपूर जिल्हा सहकारी मदज्यावर्ती बँक डबघाईस आली....

याच बँकेच पुनर्जजीवन करण्यासाठी दमहाराष्ट्र राज्य सहकारी बँकेची प्रशासक म्हणून नेमणूक करण्यात आलेली आहे..

या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तथा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित आहे...

Mar 30, 2025 15:44 (IST)

Nagpur News: नागपूर बँकेला सावरण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न

नागपूर बॅंकेला सावरण्याचा राज्य सरकारचा वेगळा प्रयत्न 

५०० कोटींचे रोखे जारी

१० वर्षांसाठी रोखे 

तिन दिवसात १०० कोटींचे रोखे विकले गेले

वन टू वन विद्याधर अनास्कर

बॅंकेच्या गुंतवणूक साठी राज्य शिखर बॅंकेची हमी

नागपूर बॅंकेचा फलकही बदलला

कर्मचाऱ्यांना ड्रेस

Advertisement
Mar 30, 2025 15:44 (IST)

Pune News: पुणेकरांची सोने खरेदीसाठी लगबग

पुणेकरांची सोने खरेदीसाठी लगबग 

पुण्यातील सराफ बाजारात सोने खरेदीचा उत्साह 

गुढीपाडव्याचा मुहूर्त साधत पुणेकरांकडून मोठी सोने खरेदी 

पुण्यात सोन्याचा भाव ८९ हजाराच्या वर तरी देखील आहे सराफा बाजारात गर्दी 

पुण्याच्या सराफा बाजारात मात्र उत्साह 

कुणाकडून लग्नासाठी सोने खरेदी तर कुणाकडून केवळ बचतीसाठी सोने खरेदी

Mar 30, 2025 15:18 (IST)

Live Update : धावत्या दुचाकीवर झाडाची फांदी कोसळली, झोमॅटोचा डिलिव्हरी बॉय थोडक्यात बचावला

विरारमध्ये रस्त्यावरून जाणाऱ्या दुचाकीस्वाराच्या अंगावर अचानाक झाडाची मोठी फांदी कोसळून झालेल्या अपघातात दुचाकीस्वार थोडक्यात बचावला आहे. विरार पश्चिमेला उंबरगोठण गावात चाळपेठ परिसरात शनिवारी रात्री साडेदहाच्या सुमारा झोमॅटो कंपनीचा डिलिव्हरी बॉय दुचाकीवरून जात होता. त्यावेळी अचानक एका मोठ्या झाडाची फांदी कोसळली. त्यात दुचाकी स्वार अवघ्या एका सेंकदासाठी बचावला. मात्र त्याची दुचाकी घसरली. तो किरकोळ जखमी झाला. स्थानिकांनी या तरुणाला उपचारासाठी तत्काळ रु्गणालयात दाखल केले. यावेळी झाडाची फांदी महावितरणाच्या तारेवर पडल्याने स्पार्क होऊन आगीच्या  ठिणग्या पडल्या, सुदैवाने यावेळी मोठी दुर्घटना टळली. 

Mar 30, 2025 12:29 (IST)

Live Update : येत्या काळात लोकांच्या सेवेत अधिक दर्जेदार डॉक्टर उपलब्ध व्हावेत यासाठी प्रयत्नशील - पंतप्रधान मोदी

माधव नेत्रालय एक असं संस्थान आहे, जे अनेक वर्षांपासून लोकांची सेवा करत आहे. यामुळे लोकांच्या आयुष्यात प्रकाश येतो. नव्या परिसराची पायाभरणी होत आहे. यामुळे आणखी लोकांच्या आयुष्यातील अंध:कार दूर होईल. त्यानिमित्ताने माधव नेत्रालयाशी जोडलेल्यांना शुभेच्छा..

आज स्वास्थ क्षेत्रात देश ज्या पद्धतीने काम करतोय.  माधव नेत्रालय त्या प्रयत्नांना वाढवत आहे. देशातील प्रत्येक व्यक्तीला प्राथमिक आरोग्य सुविधा मिळाव्यात ही आमची प्राथमिकता आहे. आयुष्मान भारतामुळे कोट्यवधींना मोफत सुविधा मिळत आहेत. हजारो जन सुविधा केंद्र मध्यमवर्गीय आणि गरजूंना स्वस्त औषधं देत आहेत. गेल्या दहा वर्षात गावांमध्ये लाखो आरोग्य आयुष्मान मंदिर तयार झाले आहेत. येत्या काळात लोकांच्या सेवेसाठी अधिकाधिक दर्जेदार डॉक्टर उपलब्ध व्हावेत. यासाठी देशातील गरीब व्यक्तीला 

विद्यार्थ्यांना आपल्या मातृभाषेत डॉक्टर होण्याची संधी दिली. योग आणि आयुर्वेदही आज संपूर्ण जगात नवी ओळख मिळाली आहे. भारताचा सन्मान वाढत आहे. 

Mar 30, 2025 12:18 (IST)

Live Update : पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपुरातून Live

Mar 30, 2025 11:37 (IST)

Live Update : राज्यभरात गुढीपाडव्याचा उत्साह; मराठी संस्कृतीचा जागर, ढोल- ताशांचा गजर

Mar 30, 2025 10:59 (IST)

Live Update : प्रशांत कोरटकरला न्यायालयीन कोठडी, कोरटकरचे वकील आजच जामीनासाठी अर्ज करणार

प्रशांत कोरटकरला न्यायालयीन कोठडी, कोरटकरचे वकील आजच जामीनासाठी अर्ज करणार 

Mar 30, 2025 10:06 (IST)

Live Update : थोड्याच वेळात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते माधव नेत्रालयाचं भूमिपूजन होणार

थोड्याच वेळात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते माधव नेत्रालयाचं भूमिपूजन होणार

Mar 30, 2025 09:25 (IST)

Live Update : पुण्यात अवैधपणे सुरू असलेल्या हुक्का पार्लरवर पोलिसांची कारवाई

पुण्यात अवैधपणे सुरू असलेल्या हुक्का पार्लरवर पोलिसांची कारवाई 

मनाई असून देखील शहरात बेकायदेशीर रित्या हक्का पार्लर चालवणाऱ्या ३ आरोपींनी विरोधात गुन्हा दाखल 

पुण्यातील कोरेगाव पार्क पोलीस स्टेशनच्या हद्दीत मोक्का हॉटेलमध्ये बेकायदेशीर रित्या सुरू होत हुक्का पार्लर 

शहरात बंदी असताना देखील हक्कायाची विक्री करणाऱ्याच्या विरोधात पुणे पोलीस आक्रमक 

अर्षद तांबोळी, अक्षय जनार्दन धवन, लक्ष्मण तिवारीत असं गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे

Mar 30, 2025 09:10 (IST)

Live Update : पंतप्रधान नरेंद्र मोदी रेशीमबाग संघ मुख्यालयात दाखल...

पंतप्रधान नरेंद्र मोदी रेशीमबाग संघ मुख्यालयात दाखल...

Mar 30, 2025 09:09 (IST)

Live Update : शिवसेना नेते आदित्य ठाकरे गिरगावातील शोभायात्रेत सहभागी

शिवसेना नेते आदित्य ठाकरे गिरगावातील शोभायात्रेत सहभागी

Mar 30, 2025 08:43 (IST)

Live Update : पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपूर विमानतळावर दाखल...

पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपूर विमानतळावर दाखल...

Mar 30, 2025 08:15 (IST)

Live Update : गुढी पाडव्यानिमित सांगलीत सूर पहाटेचे आयोजन

साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जाणारा आणी मराठी नववर्षाची सुरुवात ज्या सणाने होते, अशा गुढीपाडव्याच्या मंगल सणाचे स्वागत आज सांगलीकरांनी सूरपहाटेचे या मराठी सुगम गायनाच्या मैफिलीने केली मैफिलीसाठी आणि नव वर्षाच्या स्वागतासाठी सांगलीकर नागरिक आणि मराठमोळ्या श्रोत्यांनी मोठी हजेरी लावत मराठी नववर्षाचे स्वागत केले. 

Mar 30, 2025 08:13 (IST)

Live Update : नागपूर शहरात गुढी पाडवा आणि हिंदू नववर्ष निमित्ताने अनेक कार्यक्रमांचं आयोजन

आज नागपूर शहरात गुढी पाडवा आणि हिंदू नववर्ष निमित्ताने अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून तात्या टोपे नगर गणेश मंदिरातून लक्ष्मी नगर आठ रस्ता चौक पर्यंत भव्य मिरवणूक काढण्यात आली आहे. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहू शकणार नाहीत असे आता आता आयोजकांना कळविण्यात आले आहे. पंतप्रधान मोदी येणार असल्याने व्यस्त कार्यक्रमामुळे मुख्यमंत्री मिरवणुकीत येऊ शकणार नाहीत.  विमानतळावर राज्यपाल आणि पंतप्रधानांना स्वागत करण्यास जाणार आहेत.

Mar 30, 2025 07:31 (IST)

Live Update : आज मध्य रेल्वेचा सहा तासांचा विशेष ब्लॉक

आज मध्य रेल्वेचा सहा तासांचा विशेष ब्लॉक, सकाळी 8.30 ते दुपारी 2.30 या वेळेत विशेष ब्लॉक, मात्र पश्चिम रेल्वेवर कोणताही ब्लॉक नाही

Mar 30, 2025 07:31 (IST)

Live Update : मनसेचा आज गुढीपाडवा मेळावा, मुंबईच्या शिवाजी पार्क मैदानावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार

मनसेचा आज गुढीपाडवा मेळावा, मुंबईच्या शिवाजी पार्क मैदानावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार, राज ठाकरे नेमकं काय बोलणार? याकडे सर्वांचंच लक्ष

Mar 30, 2025 07:30 (IST)

Live Update : तप्रधान नरेंद्र मोदी आज नागपूर दौऱ्यावर

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नागपूर दौऱ्यावर , मोदींच्या हस्ते माधव नेत्रालयाचं भूमिपूजन होणार, रेशीमबाग स्मृती मंदिरातही जाणार आहेत. मोदींच्या सुरक्षेसाठी शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.