Jalgaon News : अजित पवार गटात प्रवेश करताच गुलाबराव देवकरांच्या अडचणीत वाढ? जुन्या प्रकरणाची चौकशी सुरु

अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करताच गुलाबराव देवकरांच्या चौकशीला सुरुवात झाल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins

मंगेश जोशी, जळगाव

गुलाबराव देवकर यांनी दोनच दिवसांपूर्वी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटातून अजित पवार गटात प्रवेश केला होता. राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करताच गुलाबराव देवकर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. कारण पक्षप्रवेशाला 24 तास उलटत नाही तोच गुलाबराव देवकरांच्या 10 कोटी रुपयांच्या कर्जाप्रकरणी चौकशी सुरू झाली आहे.  

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

धुळ्याचे उपजिल्हा निबंधक राजेंद्र वीरकर यांच्या नेतृत्वात असलेले चौकशी पथक हे जिल्हा बँकेत दाखल झाले आहे.  पथकाकडून याप्रकरणी जिल्हा बँकेत सखोल चौकशी केली जात आहे. तर जिल्हा बँकेकडून चौकशी पथकाला पूर्ण सहकार्य केलं जात असल्याची माहिती जिल्हा बँकेचे कार्यकारी संचालक जितेंद्र देशमुख यांनी दिली आहे. 

(नक्की वाचा-  Ajit Pawar:'अजित पवारांचे मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पूर्ण होईल, पण त्यांनी...' थेट ऑफर कुणी दिली?)

माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्या श्रीकृष्ण शैक्षणिक संस्थेच्या नावे दहा कोटींचे कर्ज घेण्यात आले होते. विधानसभा निवडणूक काळात हे कर्ज घेतल्याचा आरोप मंत्री गुलाबराव पाटील यांनी केला होता. हे भ्रष्टाचार लपवण्यासाठी देवकर हे अजित पवारांसोबत केली असल्याची टीकाही गुलाबराव पाटील यांनी केली होती. 

काय म्हणाले होते गुलाबराव पाटील?

गुलाबराव देवकरांनी जरी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत पक्षप्रवेश केला असला तरी मात्र त्यांचे घोटाळे हे लपणार नाहीत. घोटाळे लपवण्यासाठीच ते अजित पवारांसोबत जात असल्याचा हल्लाबोल गुलाबराव पाटलांनी केला आहे. तर एकीकडे माणसं तपासून पक्षात घेत असल्याचे अजित पवार छाती ठोकपणे म्हणत असले तरी देवकरांसारखी चांगली माणसं  त्यांनी तपासली असल्याचा खोचक टोला गुलाबराव पाटलांनी अजित पवारांनाही लगावला आहे. 

Advertisement

Topics mentioned in this article