जाहिरात

MNS News: 'तुझ्या राज ठाकरेलाही सांगतो...', गुणरत्न सदावर्ते अन् मनसे नेत्याची बाचाबाची, फोनवर जोरदार जुंपली

सदावर्तेंच्या या विधानानंतर मनसे प्रवक्ते योगेश खैरे यांनी त्यांना फोन करुन जाब विचारला. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये जोरदार बाचाबाचीही झाली. 

MNS News: 'तुझ्या राज ठाकरेलाही सांगतो...', गुणरत्न सदावर्ते अन् मनसे नेत्याची बाचाबाची, फोनवर जोरदार जुंपली

मुंबई: मराठी भाषेवरुन मनसे पुन्हा एकदा आक्रमक झाली असून  मनसे कार्यकर्ते बँकांमध्ये जात तेथील कामकाज पाहत आहेत. यावरुनच वकील गुणरत्न सदावर्ते यांनी  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली असून  राज ठाकरे यांचे कार्यकर्ते जिथे लोकांचा अपमान करत असतील तिथे सन्मानित करू असे विधान केले आहे. सदावर्तेंच्या या विधानानंतर मनसे प्रवक्ते योगेश खैरे यांनी त्यांना फोन करुन जाब विचारला. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये जोरदार बाचाबाचीही झाली. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

काय म्हणाले गुणरत्न सदावर्ते?

'कोण योगेश खैरे मी ओळखत नाही.  मी मांडलेली भूमिका योग्य आहे. सुप्रीम कोर्टापर्यंत लढू. राज ठाकरेंना उत्तर द्यायला सांगा. तुम्ही कशाला फोन करता. राज ठाकरेंना फोन कर ना बाबा. संविधानापेक्षा मोठा नाही. एखाद्या  टॅक्सीवाल्याला हात लावून दाखव, तुझ्या राज ठाकरेलाही सांगतो काय असतो कायदा ते.  आता व्हायरल करुन भीक माग.." असे म्हणत गुणरत्न सदावर्ते यांनी खैरे यांना अपशब्द वापरले.  (टीप: 'एनडीटीव्ही मराठी' या संवादाची पुष्ठी करत नाही)

अखील खैरेंचा संताप!

गुणरत्न सदावर्ते यांचं कायद्याचं ज्ञान कमी आहे. आरबीआयचे जे निर्देश आहेत त्याच बँकांनी पालन करावं यासाठी मा.राजसाहेबांच्या आदेशानुसार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महाराष्ट्र सैनिक आग्रह धरण्यासाठी बँकांमधे जात आहेत. जिथं त्यांना योग्य प्रतिसाद मिळतो तिथं ते चर्चा, निवेदन या माध्यमातून हा आग्रह धरत आहेत. जिथं अरेरावीची भाषा केली जाते तिथं मात्र संघर्ष होतो. कारण मनसेचा डीएनए हा संघर्षाचा आहे. सदावर्ते आरडाओरडा करून मलाच फार कळतं असा आव कायमच आणत असतात. अशा लोकांनी कितीही आरडाओरडा केला तरी मनसे मराठीसाठी संघर्ष करतच राहणार, असे म्हणत अखील खैरे यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. 

(नक्की वाचा-  महिलेच्या जाळ्यात फसला! 150 रुपयांचा मोह, सागर कारंडेकडून 60 लाख लुटले, कसा झाला स्कॅम?)

 काय म्हणाले होते गुणरत्न सदावर्ते?

'राज ठाकरे यांचे कार्यकर्ते जे करत आहेत त्याची तक्रार केली आहे. जो कोणी गुंड गर्दी करत आहेत ते उद्यापासून होणार नाही ज्यांच्यावर कार्यकर्ते हल्ला करत आहे ते तक्रार करत नाहीत.  गुजराती असो हिंदी असो मराठी असो इंग्रजी असो मेरी मर्जी..' असे म्हणत गुणरत्न सदावर्ते यांनी मनसेच्या मराठी भूमिकेवर टीका केली आहे.