5500 हजार वर्षांचा इतिहास, महर्षी व्यासांचं एकमेव मंदिर; महाराष्ट्रातील एकमेव मंदिरात गुरु पौर्णिमेनिमित्त मोठी गर्दी

भारत भूमीत महर्षी व्यासांचे केवळ तीन ठिकाणी मंदिरा असून पहिले मंदिर हे बद्रिकारण्यातील व्यासचट्टी येथे असून दुसरे मंदिर वाराणसी मध्ये आहे. तर तिसरे मंदिर जळगाव जिल्ह्यातील यावल येथे असून महाराष्ट्रातील हे एकमेव मंदिर आहे. 

जाहिरात
Read Time: 3 mins

मंगेश जोशी, प्रतिनिधी

Guru Purnima 2025 : आषाढ पौर्णिमा म्हणजेच गुरुपौर्णिमेला महर्षी वेद व्यास (Maharshi Ved Vyas Temple) यांचा जन्म म्हणून या दिवसाला व्यास पौर्णिमा देखील म्हटले जाते. महर्षी वेद व्यासांनी महाभारत, श्रीमद् भागवत, ब्रह्म सूत्र व 18 पुराणांचे लेखन केलाचा उल्लेख शास्त्रार्थात आढळतो. त्यामुळे महर्षी वेदवासांना आद्य गुरु म्हणून संबोधले जाते. त्यामुळे गुरुपौर्णिमेला महर्षी वेद व्यासांची पूजा केली जाते. महर्षी व्यास हे सप्तचिरंजीवांमधील एक चिरंजीव असून त्यामुळे कलियुगातही वेदमहर्षी व्यासांचे अस्तित्व असल्याची अनेक भाविकांची श्रद्धा आहे. भारत भूमीत महर्षी व्यासांचे केवळ तीन ठिकाणी मंदिरा असून पहिले मंदिर हे बद्रिकारण्यातील व्यासचट्टी येथे असून दुसरे मंदिर वाराणसी मध्ये आहे. तर तिसरे मंदिर जळगाव जिल्ह्यातील यावल येथे असून महाराष्ट्रातील हे एकमेव मंदिर आहे. 

यावल हे शहर सातपुडा पर्वतरांगाच्या पायथ्याशी वसलेले असून महाभारत काळात या ठिकाणी घनदाट जंगल होते. या जंगलातून वाहणारी हरिता व सरिता या नद्यांच्या संगमातून दक्षिण वाहिनी म्हणून ओळख असलेल्या सूर नदीचा उगम झाला आणि याच सूर नदीच्याजवळ असलेल्या टेकडीवर लोमेश ऋषींचा आश्रम होता. या आश्रमात लोमेश ऋषींनी जनकल्याणासाठी यज्ञ सुरू केला. त्यावेळी अज्ञातवासातून मुक्त झालेले पांडव हे हस्तीनापुरकडे परतीचा प्रवास करत असताना लोमेश ऋषींच्या आश्रमावर विश्रांतीसाठी आले.

Advertisement

लोमेश ऋषींनी पांडवांच्या हस्ते श्री वेद महर्षी व्यासांना यज्ञासाठी निमंत्रित पाठवले. पांडवांकडून लोमेश ऋषींचे निमंत्रण मिळाल्याने महर्षी व्यासांनी लोमेश ऋषींच्या आश्रमात येऊन यज्ञात सहभाग घेत यज्ञ पार पाडला व त्यामुळे काही वर्ष महर्षी व्यासांचा वास्तव्य हे यावल नगरीत होते. त्यामुळे अनेक वर्ष महर्षी व्यासांचे या ठिकाणी वास्तव्य होते आणि त्या दरम्यान महर्षी व्यासांनी महाभारतातील काही श्लोक या ठिकाणी रचल्याचा काही ग्रंथांमध्ये उल्लेख आहे. त्यानुसार यावल येथील वेद महर्षी व्यासांच्या मंदिराला साडेपाच हजार वर्षांचा इतिहास असल्याचे मानले जाते. 

Advertisement

Advertisement

नक्की वाचा - Sangli News : बेंदूर सणानिमित्त सांगलीतील प्रसिद्ध गज्या बैलाच्या सांगाड्याची गावातून मिरवणूक; पण काय आहे कारण?

ध्यान मूलं गुरु मूर्ति पूजा मूलं गुरु पदम। मंत्र मूलं गुरु वाक्यं मोक्ष मूलं गुरु कृपा॥ या श्लोकाप्रमाणे हिंदू शास्त्रात गुरूंना अनन्यसाधारण महत्त्व आहे. तिन्ही देवांमध्ये ही गुरूंचे सर्वोच्च स्थान असल्याने गुरु पूजन, गुरु भजन व गुरु स्मरणाला अध्यात्मात महत्त्व आहे. त्यामुळे गुरुपौर्णिमेनिमित्त यावल येथील श्री वेद महर्षी व्यास मंदिरात गुरु पौर्णिमेचा उत्सव हा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो व राज्यभरातून तसेच परराज्यातूनही मोठ्या संख्येने भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येतात.

यावर्षी ज्योतिषाशास्त्र प्रमाणे ही गुरुपौर्णिमेचा दिवस हा सर्वोत्तम 

यावर्षी गुरुपौर्णिमा गुरुवारी आली असून आज चंद्र ही गुरु राशी स्वामी असलेल्या धनु राशीत आहे. त्यामुळे ज्योतिष्य शास्त्राप्रमाणे आजचा दिवस हा महत्त्वाचा मानला जात असून आजच्या दिवशी गुरु ग्रहाची उपासना केल्यास जातकाचे गुरुबल वाढते. असा कयास ज्योतिषाचार्य वर्तवतात. 

श्री वेद महर्षी व्यास व श्रीराम मंदिर संस्थांच्या वतीने गुरुपौर्णिमेनिमित्त पहाटे चतुर्वेदी ब्रह्मवृंदांच्या मंत्रोच्चारात वेद महर्षी व्यासांची महापूजा व महाअभिषेक करण्यात आला. व भाविकांच्या उपस्थितीत महाआरती करण्यात करून दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात आले. तसेच मंदिर प्रशासनाच्या वतीने भाविकांसाठी महाप्रसादाचे देखील आयोजन करण्यात आलेली असून गुरुपौर्णिमेनिमित्त जळगाव जिल्ह्याचे राज्यभरातून हजारो भाविक हे यावल व्यास नगरीत दाखल झाले आहेत.

Topics mentioned in this article