Maharashtra Rain: राज्यभर मुसळधार! नद्यांना पूर, गावांचा संपर्क तुटला, कुठे काय परिस्थिती?

या दमदार पावसामुळे धरणांच्या पाणीसाठ्यात चांगली वाढ झाली असून जिल्ह्यातील 71 धरणांपैकी 48 धरणं 100 टक्के भरली आहेत. 

जाहिरात
Read Time: 3 mins

Maharashtra Rain Updates:  एकीकडे मुंबईमध्ये पाण्याची तुफान बॅटिंग सुरु असतानाच राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्येही पावसाचे थैमान पाहायला मिळत आहे. रायगड, रत्नागिरी, कोल्हापूरसह बीड, विदर्भ मराठवाड्यात पावसाची तुफान बॅटिंग सुरु आहे. या पावसामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला असून नद्या, नाल्यांना पूर आला आहे. अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर जिवीतहानीही झाली आहे. जाणून घ्या राज्यभरातील पावसाच्या अपडेट्स! 

रत्नागिरीमध्ये मुसळधार!

रत्नागिरी जिल्ह्यात सकाळपासूनच मुसळधार पाऊस सुरू आहे. संगमेश्वरच्या माखजन बाजारपेठेत गडनदीचं कालपासून पाणी घुसल्याने 10 ते 12 दुकानांचं नुकसान झाले आहे.  खेडची जगबुडी, चिपळूणमधील वाशिष्ठी, संगमेश्वरमधील शास्त्री, बावनदी आणि सोनवी, लांजा तालुक्यातील काजळी आणि राजापूरमधील कोदवली नदी इशारा पातळीवरून वाहत आहेत. या दमदार पावसामुळे धरणांच्या पाणीसाठ्यात चांगली वाढ झाली असून जिल्ह्यातील 71 धरणांपैकी 48 धरणं 100 टक्के भरली आहेत. 

Mumbai Rain LIVE: पावसाचा सर्वात मोठा फटका, मध्य रेल्वे ठप्प; वाचा अपडेट्स

कोल्हापुरला पुराचा धोका!

दुसरीकडे कोल्हापूरमध्येही पावसाचा जोर वाढला आहे. सततच्या पावसामुळे  राधानगरी धरणच्या सातही धरणातून पाणी विसर्ग सुरु असून पंचगंगा नदीची पाणी पातळी 34.9 फुटावर पोहोचली आहे.  कोल्हापुरात संभाव्य पूर परिस्थितीच्या अनुषंगाने प्रशासनाकडून खबरदारी घेण्यात येत आहे. आपत्ती व्यवस्थापनाकडून तैनात आलेल्या आहे का टीमकडून पंचगंगा नदीच्या पाण्याची पातळी तपासण्याचं काम सुरू आहे.  पंचगंगा नदीचे पाणी कितपत आहे याचा जीपीएस ट्रॅकिंग च्या आधारे आढावा घेतला जात आहे. नदी परिसरात बोटीतून तांत्रिक उपकरणाच्या सहाय्याने लॅपटॉप मध्ये हा डेटा रेकॉर्ड केला जात आहे. पूर परिस्थितीच्या अनुषंगाने प्रशासन पूर्णपणे अलर्ट मोडवर असल्याचे पाहायला मिळते. 

भीमा नदीतून मोठ्या प्रमाणावर विसर्ग!

उजनी आणि वीर धरणातून पंढरपूरच्या भीमा नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग येत आहे. वीर धरणातून 23 हजार क्युसेक तर उजनी धरणातून 6 हजार क्युसेकने पाणी भीमेच्या पात्रात येत आहे. अशा परिस्थितीत भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे. त्यामुळे पंढरपूरला पुन्हा एकदा पुराचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. आज सकाळी 11:00 वाजलेपासून धरणांमधून भीमा नदीत पाणी सोडण्यात सुरुवात झाली आहे. पुणे जिल्ह्यात सध्या भीमा खोऱ्यात दमदार पाऊस सुरू झाला आहे. परिणामी आता भीमेच्या पाणी पातळीत मोठी वाढ होईल.

Advertisement

Nanded Flood News: नांदेडला यलो अलर्ट! सैन्य दलाचे 'सुदर्शन चक्र' मदतीसाठी तैनात; 9 जण अद्याप बेपत्ता

बीडच्या माजलगाव धरणाची पाणी पातळी वाढली! 

 गेल्या पाच-सहा दिवसांपासून जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे माजलगाव धरणातील पाणीपातळी लक्षणीयरीत्या वाढली आहे. आज मंगळवारी सकाळी दहा वाजेपर्यंत धरण ५६ टक्क्यांवर भरले असून सध्या दहा हजार क्यूसेकने पाण्याची आवक सुरू आहे.  सततच्या पावसामुळे धरणातील पाणीसाठा जलद गतीने वाढत आहे. आवक याच वेगाने कायम राहिल्यास रविवार पर्यंत धरण ८० टक्क्यांवर पोहोचेल असा अंदाज जलसंपदा विभागाने व्यक्त केला आहे. धरणातील वाढलेल्या पाणीसाठ्यामुळे बीड आणि माजलगावसह  २२ गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तूर्तास मिटला आहे.

पालघर तालुक्याच्या पूर्व भागात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. सलग पावसामुळे सूर्या, वैतरणा, वांद्री आणि हात नद्या तुडुंब भरून वाहत आहेत. त्यामुळे अनेक गावातील रस्ते पाण्याखाली गेले असून, वाहतूक व्यवस्था ठप्प झाली आहे.महामार्गालगतच्या ढेकाळे आणि हालोली गावात नाल्याच्या पुराचे पाणी घुसल्याने घरांमध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. सीताड पाड्यातील तीन व हालोलीतील सांबरे पाड्यातील सहा घरांत पाणी शिरल्याने गृहपयोगी साहित्य व सामान भिजून गेले आहे.