जाहिरात
1 minute ago

Mumbai Rain LIVE Updates:  गेल्या 24 तासांपासून मुंबई, पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रात पावसाने अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. सोमवारी बरसलेल्या तुफान पावसाने मुंबईकरांची अक्षरश: दाणादाण उडाली. शहरातील अनेक भागात पाणी साचले तसेच रेल्वे सेवा, रस्ते वाहतूक सेवाही ठप्प झाल्याचे पाहायला मिळाले. आजही मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला असून मुंबई, ठाणे, कल्याणमधील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. 

दुसरीकडे विदर्भ, मराठवाड्यातही पावसाची तुफान बॅटिंग पाहायला मिळत असून अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. रायगड रत्नागिरी, छत्रपती संभाजीनगरमध्ये आभाळ फाटल्यासारखा पाऊस कोसळत असून अनेक ठिकाणी जिवीतहानी, पशुहानी झाल्याच्या घटना घडत आहेत. राज्यभरातील या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय यंत्रणा अलर्ट झाल्या आहेत. 

Raigad Rain LIVE Update: रायगड जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू

रायगड जिल्ह्यात आजही पावसाची संततधार सुरू आहे. जोर कमी झाला असला तरी अधून मधून पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी बरसत आहेत.  महाडच्या सावित्री नदीची पाणी पातळी कमी झाल्याने महाडकरांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. मात्र माणगाव मधील पाणी अद्याप ओसरलेले नाही. 

माणगावात बामणोली रोडवर अजूनही पाणी साचले असून नागरिकांनी उभी करून ठेवलेली वाहने पाण्यात बुडाली आहेत. हवामान खात्याने आज जिल्ह्यासाठी पावसाचा रेड अलर्ट दिल्याने प्रशासन सतर्क आहे.  सर्व यंत्रणांना सज्ज राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील शाळा महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे.

Mumbai Rain Local Train LIVE Stutus: कल्याणमधून निघणाऱ्या लोकल गाड्यांचाही खोळंबा

कल्याण डोंबिवलीत सकाळपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. या पावसामुळे लोकल गाड्या उशिराने धावत आहेत. सध्या लोकल गाड्या  दहा ते पंधरा मिनिटं उशिराने धावत असल्याची रेल्वे प्रशासनाची माहिती

Mumbai Rain Local Stautus: पावसाचा लोकल सेवेवर परिणाम! पश्चिम रेल्वेवरील गाड्या उशिरा

मुंबईतील पावसाचा लोकल सेवेवर मोठा परिणाम झाला आहे. पश्चिम रेल्वे मार्गावरील गाड्या 15- ते २० मिनिटे उशिरा धावत असल्याचे समोर आले आहे. रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने लोकलचा खोळंबा झाला आहे. सध्या पंपाद्वारे पाणी काढण्याचे पाणी सुरु आहे. 

Mumbai Rain LIVE Updates: वसई विरार नालासोपारा परिसरात मुसळधार पावसाचा तडाखा, सखल भागामध्ये पाणी साचले

 वसई विरार नालासोपारा परिसरात मुसळधार पावसाचा  तडखा.. अनेक सखल भागामध्ये पाणी साचले असून जनजिवन विस्कळीत झाले आहे. नालासोपाराअचोले रोड नालासोपारा वसई लिंक रोड, डॉन लेन, स्टेशनं परिसरात पाणी भरले, तर विरार पश्चिम भागातील रस्ते पाण्याखाली.. अतिवृष्टी च्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक तसेच खासगी आणि अनुदानित शाळांना शाळांना सुट्टी जाहीर केली आहे

Mumbai Rain LIVE Updates: मुंबई उपनगरात सकाळपासून जोरदार पाऊस सुरु, एलबीएस मार्गावर पाणी

मुंबई उपनगरात सकाळपासून जोरदार पाऊस सुरू 

Lbs मार्गावर पावसाचे पाणी भरण्यास सुरुवात 

घाटकोपर,विक्रोळी, कांजूर मार्ग, भांडुप मधील सकल भागात पाणी भरण्यास सुरुवात

Kolhapur Rain LIVE Updates: कोल्हापुरात पावसाचा जोर वाढला, राधानगरीच्या सातही धरणातून पाणी विसर्ग सुरु

कोल्हापुरात पावसाचा जोर वाढला 

रात्रभर संततधार पाऊस 

राधानगरी धरणच्या सातही धरणातून पाणी विसर्ग सुरु 

पंचगंगा नदीची पाणी पातळी 34.9 फुटावर 

प्रशासनाकडून वेळोवेळी नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

आपत्तीव्यवस्थापन विभाग सज्ज

Buldhana Rain LIVE Updates: सिंदखेडराजा तालुक्यात अतिवृष्टीने बांध फुटला; शंभर एकर शेतीचे नुकसान

बुलढाणा जिल्ह्याच्या सिंदखेडराजा तालुक्यातील जांभोरा येथिल शेततलाव फुटला मुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान सदर मातीनाला शेत तलावांचे निर्माण आठ वर्षापूर्वी झाले होते या माती नालाबांध तलावाचे व्यवस्थित देखरेख न झाल्याने या भागात मुसळधार पाऊस पडल्याने हा फुटल्याने परिसरातील शंभर एकर शेतीचे नुकसान झाले आहे रमेश खरात उध्दव खरात यांच्या शेता लगत हा बांधारा.होता फुटल्याने शेतीचे मोठ्या प्रमानत नुकसान झाले आहे.

Mumbai Rain LIVE Update: भांडुपच्या सकल भागात पाणी साचलं

सकाळपासून उपनगरात जोरदार पावसाची हजेरी: भांडुपच्या सकल भागात पाणी साचायला सुरुवात;  सकळ भागात पाणी साचल्यामुळे घरात आणि दुकानात मोठ्या प्रमाणात पाणी

Konkan Rain LIVE Updates: तळकोकणात मुसळधार, मासेमारीसाठी जाऊ नये, नितेश राणेंचे आवाहन

तळकोकणाला रात्रभर मुसळधार पावसाने झोडपून काढलं. त्यामुळे सह्याद्रीच्या पट्ट्यातू वाहणाऱ्या कर्ली नदीच्या उगमा जवळील तीन ते चार पूल पाण्याखाली गेली. आंबोली मधील मुख्य धबधब्याचे रौद्ररूप धारण केलं. जिल्हाला आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. सिंधुदुर्ग किनाऱ्यावर विजयदुर्ग ते तेरेखोल पर्यंत उंच लाटांचा इशारा आज दुपार नंतर ते  उद्या दुपारी २:३० या वेळेत ३.५-३.७ मीटर उंचीच्या लाटा उसळण्याचा अंदाज आहे. त्यामुळे मच्छीमारांनी समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये असं आवाहन मंत्री नितेश राणेंनी देखील सोशल मीडियावरून केलं आहे.

Mumbai Rain LIVE Updates: गांधी मार्केट परिसरातही पाणी साचलं

मुंबईमधील गांधी मार्केट परिसरात पाणी साचले..

Mumbai Rain LIVE Updates: खडकवासला धरणातून विसर्ग वाढणार, नागरिकांनी सतर्क राहावे!

खडकवासला धरण क्षेत्रात झालेल्या अतिपर्जन्यमुळे धरणातील पाण्याची पातळी झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे आज सकाळी 8 वाजता धरणातून 2178 क्युसेक तर सकाळी 9 वाजता 4170 क्युसेक पाणी नदीपात्रात सोडण्यात येणार आहे, अशी माहिती मुठा कालवे पाटबंधारे उपविभाग, पुणे यांनी दिली आहे.

पुढील काळात पावसाचे प्रमाण आणि धरणातील येव्या नुसार विसर्गाचे प्रमाण कमी-जास्त होऊ शकते.

प्रशासनाने नागरिकांना नदीकाठच्या भागात अनावश्यक वावर टाळण्याचे आणि सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

Mumbai Rain LIVE Updates: दादर टीटी परिसर, अंधेरी सवबे परिसरात पाणी साचलं

मुंबईमध्ये पावसाचे धुमशान सुरु असून दादर टीटी सर्कलला पाणी साचलं आहे.  रस्त्याच्या दोन्ही बाजूला पाणी साचल आहे, त्यामुळे वाहनचालकांना मोठी कसरत करायला लागत आहे. 

Maharashtra Rain: अकरावी प्रवेशाबाबत प्रशासनाचा मोठा निर्णय

राज्यात विविध ठिकाणी होत असलेल्या जोरदार पावसामुळे शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना सुटी जाहीर करण्यात आली आहे

त्यामुळे अकरावीला प्रवेश घेणान्या विद्यार्थयाची होणारी गैरसोय टाळण्यासाठी शिक्षण संचालनालयाने विद्यर्थयाना प्रत्यक्ष महाविद्यालयात जाऊन प्रवेश् घेण्याठी दोन दिवसांची मुदतवाढ दिली आहे

त्यानुसार ११ ते २० ऑगस्टपर्यत असलेली मुदत २२ ऑगस्टपर्यत वाढविण्यात आली आहे

Mumbai Rain LIVE Updates: मुंबईत सलग पाचव्या दिवशी पावसाचे तुफान

मुंबईत सलग चौथ्या दिवशी पावसाची बॅटिंग पाहायला मिळत आहे

मुंबईत आज रेड अलर्ट जाहीर केलं आहे

पुढचे काही तास पाऊस असाच सुरु राहिला तर काल सारखी परिस्थिती होऊ शकते

Mumbai Rain LIVE Updates: पुढील 3 तास महत्त्वाचे... मुंबई शहर, उपनगरात मुसळधार पावसाचा इशारा

पुढील ३ तासांत मुंबई शहर, मुंबई उपनगर, पालघर, रायगड, रत्नागिरी, ठाणे या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तरी नागरिकांनी सतर्क राहावे. 

Mumbai Rain LIVE Updates: कल्याण, बदलापूरमध्ये रस्त्यांवर पाणी...

कल्याण -बदलापूर रोडवर वीमको नाका परिसरात रस्त्यावर साचले पाणी.. या पाण्यातून मार्ग काढताना मुंबईकरांची मोठी कसरत पाहायला मिळत आहे. 

Mumbai Rain: मुसळधार पावसामुळे माती खचून झाडे पडली

लातूर जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे सर्वच नद्यांना पूर आल्याचे पहायला मिळत आहे तर शेती पीकांचंही मोठं नुकसान झालं आहे. काही ठिकाणी माती खचुन झाडं आडवी पडली असल्यामुळे रस्ते बंद झाले आहेत. शेतीतला उस आडवा पडला आहे तर हाता तोंडाशी आलेली उडीद आणि मुगाची पिकं जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Mumbai Rain LIVE Updates: मुंबईत पावसाची बॅटिंग सुरुच

मुंबईमध्ये  सोमवारपासून सुरु झालेला पाऊस आजही सुरु आहे. शहरातील ठाणे, कळवा, नवी मुंबई, घाटकोपर, साकीनाका परिसरात तुफान पाऊस कोसळत आहे. हवामान खात्यानेही आज रेड अलर्ट जारी केला आहे. 

Track Latest News Live on NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com