Kolhapur Rain News: कोल्हापुरात मुसळधार! राधानगरी 100 टक्के भरलं, 44 बंधारे पाण्याखाली

कोल्हापूर जिल्ह्यात मागील आठवड्यात पावसाचं प्रमाण कमी होते. गेले दोन दिवस हलका पाऊस पडत होता. रात्रीपासून पावसाने जोर धरला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

विशाल पुजारी, प्रतिनिधी:

Kolhapur Rain: गेल्या दोन दिवसांपासून राज्यात पावसाने जोरदार बॅटिंग सुरु केली आहे. कालपासून कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला असून राधानगरी धरण पूर्ण क्षमतेनं भरल्यानं स्वयंचलित दरवाजे उघडण्यात आले आहेत. सकाळी 8 वाजेपर्यंतच्या माहितीनुसार धरणाच्या चार स्वयंचलित दरवाज्यातून पाण्याचा विसर्ग होत आहे. दमदार पावसामुळे पंचगंगा नदीची पाणी पातळी 26 फुटांवर गेली असून जिल्ह्यातील 44 बंधारे पाण्याखाली गेलेत. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात मागील आठवड्यात पावसाचं प्रमाण कमी होते. गेले दोन दिवस हलका पाऊस पडत होता. रात्रीपासून पावसाने जोर धरला आहे. कोल्हापूर शहरासह, पाणलोट क्षेत्रात पावसाची गती वाढली आहे. कोल्हापूरकरांचं लक्ष लागून राहिलेलं राधानगरी धरणही पूर्ण क्षमतेनं भरलं आहे. 

Mumbai Rain Live Updates : सकाळपासून मुसळधार पाऊस, गडचिरोलीतील नागरिकांचं जनजीवन विस्कळीत

सध्या धरणाचे चार स्वयंचलित दरवाजे उघडलेत. यामुळे नदीपत्रात झपाट्याने पाणी वाढणार आहे. पंचगंगा नदीची पाणी पातळी सध्या 26 फुटावर आहे. जिल्ह्यातील 44 बंधारे पाण्याखाली आहेत. कोल्हापुरातील सर्व परिस्थिती पाहता प्रशासनाकडून वारंवार नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे. 

सांगली जिल्ह्यातील चांदोली धरण 80 टक्के भरलं

सांगली जिल्ह्यातल्या शिराळा तालुक्यातील चांदोली धरण परिसरामध्ये पुन्हा अतिवृष्टी सुरू झाली आहे. त्यामुळे धरण 80 टक्के इतकं भरलं आहे. पावसाचा जोर वाढतच असल्याने धरण प्रशासनाकडून आता चांदोली धरणातून वाहना नदीत सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला असून 10 हजार 260 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.

Advertisement

पडणारा पाऊस यामुळे ३४.४० टीएमसी साठवण क्षमता असणाऱ्या चांदोली धरणात आता 28.77 टीएमसी इतके पाणीसाठा निर्माण झालेला आहे.आणि धरण क्षेत्रात पडणारा पाऊस आणि धरणात येणाऱ्या पाण्याची आवक लक्षात घेऊन धरण प्रशासनाकडुन वारणा नदी पात्रामध्ये पाण्याचा विसर्ग अधिक वाढवण्यात आला आहे. त्यामुळे वारणा नदीच्या पाणी पातळीत आणखी वाढ होणार असल्याने नदीकाठच्या गावांनी सतर्क राहावं असा आवाहन पाटबंधारे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

महाराष्ट्रातील 4 जिल्ह्यांना रेड अलर्ट, पालघर-भंडाऱ्यातील शाळांना सुट्टी जाहीर