जाहिरात

Maharashtra Rain Update : महाराष्ट्रातील 4 जिल्ह्यांना रेड अलर्ट, पालघर-भंडाऱ्यातील शाळांना सुट्टी जाहीर

आज 26 जुलै रोजी महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांना हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. वीस वर्षांपूर्वी याच दिवशी मुंबई पाण्याखाली गेली होती.

Maharashtra Rain Update : महाराष्ट्रातील 4 जिल्ह्यांना रेड अलर्ट, पालघर-भंडाऱ्यातील शाळांना सुट्टी जाहीर

Maharashtra Rain Update : आज 26 जुलै रोजी महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांना हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. वीस वर्षांपूर्वी याच दिवशी मुंबई पाण्याखाली गेली होती. त्यामुळे आज मुंबईत पावसाची काय स्थिती असेल याबाबत नागरिकांकडून चिंता व्यक्त केली जात आहे. पहाटेपासुन मुंबईत पावसाची रिपरिप सुरू आहे. सध्या तरी मुंबईत रस्ते आणि रेल्वे वाहतूक सुरळीत सुरू आहे. 

आज दुपारी 1.15 वाजता समुद्राला मोठी भरती असून साधारणपणे 4.66 मीटर उंच लाटा उसळणार आहेत. राज्यातील 4 जिल्ह्यांना आज रेड अलर्ट जारी करण्यात आला असून यात पुणे, पालघर, गोंदिया, चंद्रपूर या जिल्ह्यांचा समावेश आहे. याशिवाय, पुणे घाट आणि सातारा घाट परिसरातही मुसळधार पावसाची शक्यता असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे.

विदर्भातही मुसळधार पावसाचा इशारा...
आज विदर्भात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भातील दोन जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. गोंदिया, चंद्रपुरात अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात येतोय. संपूर्ण विदर्भात आज ताशी 40 ते 50 किमी वेगाच्या सोसाट्याचे वारे वाहण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. भंडारा आणि पालघरमधील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.  

Mumbai Rain Live Updates : आज 26 जुलै! मुंबईला मुसळधार पावसाचा इशारा, पुणे-पालघर Red Alert

नक्की वाचा - Mumbai Rain Live Updates : आज 26 जुलै! मुंबईला मुसळधार पावसाचा इशारा, पुणे-पालघर Red Alert

शनिवारी विदर्भात मुसळधार ते अती मुसळधार पावसाचा दिवस. संपूर्ण विदर्भात आज ताशी 40 ते 50 किमी वेगाच्या सोसाट्याचे वारे वाहण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. गोंदिया आणि चंद्रपूर या दोन जिल्ह्यांना विजेच्या कडकडाटासह अत्यंत मुसळधार पाऊस आणि अतिवृष्टीचा रेड अलर्ट. नागपूर, वर्धा, भंडारा, गडचिरोली, अमरावती जिल्ह्यांना मुसळधार ते खूप मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट घोषित करण्यात आला आहे. उर्वरित संपूर्ण पश्चिम विदर्भात येलो अलर्ट जाहीर करण्यात आला असून कित्येक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. 

कोल्हापुरात मुसळधार पाऊस... 
कोल्हापुरात राधानगरी धरणाचे दोन स्वयंचलित दरवाजे उघडले आहेत. 3 आणि 6 क्रमांकाचे दरवाजे उघडल्याने मोठ्या प्रमाणात पाणी विसर्ग सुरू आहे. दोन्ही दरवाजातून 2856 क्यूसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय आणि BOT पॉवर हाऊस मधून 1500 cusec असा एकूण 4356 cusec इतका विसर्ग नदी पात्रात नदी काठच्या लोकांनी दक्षता घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. 

रत्नागिरीत समुद्राला उधाण आलंय.. अजस्त्र लाटांचा गणपतीपुळे मंदिरालाही फटका..
गणपतीपुळे मंदिराच्या समोरचा गेट ओलांडून मोठ्या लाटा आत शिरल्या आहेत. गणपतीपुळे मंदिराच्या पायऱ्यापर्यंत या लाटा आल्याचं पाहायला मिळालं. या भरतीचं पाणी मंदिरापर्यंत पोहोचलंय. या अजस्र लाटांचा व्हिडिओ आता समोर आलाय. जवळपास साडेचार मीटरहून अधिक उंचीच्या या लाटा आल्या आहेत. त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचं आवाहन करण्यात आलं आहे.  


 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com