IMD Alert : मोंथा चक्रीवादळाचा दणका! पुढचे 'इतके' दिवस पाऊस घालणार धुमाकूळ, मुंबईसह 'या' ठिकाणी धो धो बरसणार

Mumbai Rain Latest Update : दक्षिण भारतात 'मोंथा' चक्रीवादळा धडकलं असून मुंबईसह कोकणात जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Mumbai Rain Update
मुंबई:

Mumbai Rain Latest Update : दक्षिण भारतात 'मोंथा' चक्रीवादळा धडकलं असून मुंबईसह कोकणात जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. आयएमडीच्या माहितीनुसार, अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. यामुळे मुंबई, मुंबई उपनगर आणि कोकणच्या विविध ठिकाणी पुढचे दोन दिवस यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. यादरम्यान, 75 टक्के परिसरात फेयरली वाईड स्प्रे म्हणजेच 45 ते 55 किमी प्रतितास वेगाने पाऊस पडण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत मच्छीमारांनी खोल समुद्रात न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता

हवामान विभागाच्या माहितीनुसार, कमी दाबाच्या पट्ट्यामुळे शनिवारी दुपारनंतर मुंबई शहर आणि उपनगरात ढगाळ वातावरण निर्माण झालं होतं. त्यामुळे हलक्या सरी कोसळल्या. तर ग्रेटर मुंबईच्या ठाणे, नवी मुंबई, कल्याण, अंबरनाथ परिसरातही पाऊस पडला. अनेक ठिकाणी दुपारी 1 ते 2 वाजताच्या सुमारासही पाऊस पडला. काही ठिकाणी शाळांनी सुट्टी जाहीर करण्यात आली होती. आज रविवारीही मुंबई शहर आणि उपनगरात ढगाळ वातावरण निर्माण झालं होतं. त्यामुळे मुंबईत संध्याकाळी काही भागात दमदार पाऊस पडला.

नक्की वाचा >> Video: एअरपोर्टवर महागडं फूड घेऊ नका.., बाईनं काय दिमाग लावला, खाऊही मिळालं अन् पैशांचीही झाली बचत

पालघरमध्ये शेतकऱ्यांच्या पीकांचं झालं मोठं नुकसान

दरम्यान, हवामान विभागाने 40-45 किमी प्रति तास वेगाने वारे वाहण्याची आणि मध्यम पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. लघर जिल्ह्यात मागील तीन दिवसांपासून पावसाचा जोर कायम आहे. संध्याकाळी 6.30 वाजताच्या सुमारास पाऊस सुरु झाला आणि उशिरा रात्रीपर्यंत पावसाने हजेरी लावली. याचसोबत वारेही वेगाने वाहत होते. त्यामुळे येथील शेतकऱ्यांच्या पीकांचं मोठं नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे.

नक्की वाचा >> मन्नत मध्ये आहे जन्नत! शाहरुख खानच्या बंगल्यातील Inside नजारा पाहून रजत बेदी थक्क, थेट फोटोच केले व्हायरल

Advertisement