जाहिरात

मन्नत मध्ये आहे जन्नत! शाहरुख खानच्या बंगल्यातील Inside नजारा पाहून रजत बेदी थक्क, थेट फोटोच केले व्हायरल

मन्नत मध्ये आहे जन्नत! शाहरुख खानच्या बंगल्यातील Inside नजारा पाहून रजत बेदी थक्क,  थेट फोटोच केले व्हायरल
Shahrukh Khan Mannat Bungalow
मुंबई:

Shahrukh Khan Mannat Bunglow Inside View :  अभिनेता शाहरुख खानच्या मन्नत बंगल्याची एक झलक पाहण्यासाठी तमाम चाहते दररोज वांद्रे येथील बँडस्टँड रोडवर रात्रंदिवस फिरत असतात. पण किंग खानच्या बंगल्यात फक्त नशिबवान लोकांनाच एन्ट्री मिळते. जो मन्नतमध्ये एकदा जातो, त्याच्या आनंदाला पारावरच उरत नाही. कारण मन्नत एखाद्या स्वर्गाहून कमी नाही, असं शाहरुखच्या चाहते म्हणतात. अशातच अभिनेता रजत बेदी यांनी मन्नत बंगला पाहण्याचा अनुभव शेअर केला आहे. रजत बेदीला शाहुरखच्या मन्नत मध्ये जाण्याची संधी तेव्हा मिळाली, जेव्हा त्याने आर्यन खानच्या डायरेक्टोरिअल डेब्यू सीरिज बाड्स ऑफ बॉलिवूडमध्ये काम केलं. ही सीरिज गेल्या माहिन्यात नेटफ्लिक्सवर प्रदर्शीत करण्यात आली. या सीरिजमध्ये रजतने जरज सक्सेनाचा रोल प्ले केला आहे. रजत बेदीला मन्नतचा नजारा कसा वाटला? जाणून घेऊयात

मन्नत बंगल्यात कसं आहे इनसाईड डेकोरेशन?

रजत बेदी यांनी एका मुलाखतीत म्हटलंय की, शाहरुख खानच्या मन्नत बंगल्यात जाणं म्हणजे बकिंघम पॅलेसला जाण्यासारखं आहे. तुम्ही ज्याप्रकारे एखाद्या विमानतळावर प्रवेश करता, जिथे तुमच्या सामानाची तपासणी केली जाते, तशाचप्रकारे मन्नतमध्ये प्रवेश करताना तुमचं सामान तपासलं जातं. बंगल्याचा एक गेट जिथे चाहते नेहमीच शाहरुखची एक झलक पाहण्यासाठी गर्दी करतात, खरंतर ते बंगल्याची एन्ट्री गेट नाहीय. शाहरुख खानच्या घरात 100 सीटर फिल्म थिएटरही आहेत. या सीरिजचा एक्सटेंडेड ट्रेलर पाहण्यासाठी मला शाहरुखच्या घरी बोलावण्यात आलं होतं. यादरम्यान, करण जौहर, श्वेता नंदा आणि खान कुटुंबीय होते.

शाहरुखच्या सिनेमाचे होते असिस्टंट डायरेक्टर

याच मुलाखतीत बेदी यांनी पुढे म्हटलं की, शाहरुखसोबत त्यांचं नातं जुनं आहे. कारण जमाना दिवाना सिनेमात ते असिस्टंट डायरेक्टर होते. शाहरुख मला प्रेमाने टायगर म्हणतात. त्यांनी मला कधीच रजन नावाने हाक मारली नाही. मी खुश आहे. मन्नतबाबत बोलताना म्हणाले, मन्नत दोन सेक्शनमध्ये बांधण्यात आला आहे. समोरचा बंगला मोठ्या इमारतीला जोडलेला आहे. तिथे सर्वांसाठी वेगवेगळे फ्लोअर आहेत. यामध्ये खूप छान डायनिंग हॉल आहेत.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com