शरद सातपुते, प्रतिनिधी
Sangali Bailgada Sharyat Viral Video : सांगलीच्या ऐतिहासिक श्रीनाथ बैलगाडी स्पर्धेचा आणि फॉरचूनरचा मानकरी हेलिकॉप्टर बैज्या आणि ब्रेक फेल या जोडीने बाजी मारली आहे. हेलिकॉप्टर बैज्या व ब्रेक फेल बैलजोडी देशातल्या सगळ्यात मोठ्या बैलगाडी शर्यतीचा मानकरी ठरला. कोल्हापूरच्या शिरोळचे बाळू दादा हजारे यांचा हेलिकॉप्टर बैज्या आणि सांगलीच्या भिलवडी येथील पाटील डेअरीचा ब्रेक फेल बैलजोडीने फॉर्च्युनर गाडीचं बक्षिसही पटकावलं. या बैलगाडी शर्यतीसाठी डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या सहा महिन्यांपासून नियोजन सुरू होते. तासगाव तालुक्यातील बोरगाव येथे शर्यत चुरशीने पार पडली. या शर्यतीचा व्हिडीओ सोशल मीडियाच्या सर्वच माध्यमांवर तुफान व्हायरल झाला आहे.
औरवाडचे अशोक जंगम हरण्या सरटी फाकड्या यांच्यात फॉर्च्यूनर साठी लढत झाली. ही लढत अतिशय चुरशीने पार पडली. या बैलगाडी शर्यतीसाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून शर्यत प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते. तर देशातील अनेक राज्यातून बैलगाडी स्पर्धकांनी भाग घेतला होता. या स्पर्धेसाठी 2500 हून अधिक बैलगाड्यां आणि पाच हजारहून अधिक बैलांची संख्या या शर्यतीला होती. या स्पर्धेदरम्यान घोडागाडी स्पर्धा आणि शॉणांच्या स्पर्धाही पार पडल्या आहेत. बैलगाडी शर्यतीत पट्टा पद्धत,राऊंड आयोजकांच्या म्हणण्यानुसार या शर्यतीला सात लाखांहून अधिक शर्यत प्रेमींनी हजेरी लावली होती.
नक्की वाचा >> 280 km उड्डाणाचा रेकॉर्ड..परदेशी तरुणाचा अपघात, मनालीच्या डोंगरात पॅराग्लायडिंगची क्रॅश लँडिंग, पाहा काय घडलं?
इथे पाहा बैलगाडा शर्यतीचा थरारक व्हिडीओ
तासगाव तालुक्यातील बोरगाव येथे मळा रणावर जवळपास 500 एकर जागेत या शर्यती पार पडल्या. एक दिवसाच्या स्पर्धेसाठी अनेक महिन्यापासून पैलवान चंद्रहार पाटील यांच्या मंडळाच्या वतीने नेटकं नियोजन करण्यात आलं होतं. ना भूतो भविष्य अशी अलोट गर्दी झाली होती. बैलगाडी शर्तीला येणाऱ्या स्पर्धकांची आणि शर्यत प्रेमींची संख्या लक्षणीय होती. 6 स्पर्धेसाठी सहा भव्यदिव्य असे स्टेज उभारण्यात आले होते. तर पूर्ण मैदान नव्याने तयार करण्यात आले होते. जमीन लेवल पासून शर्यतीसाठी अनेक सुविधा करण्यात आल्या होत्या.
नक्की वाचा >> Jugaad Video: मोटरशिवाय बोअरवेलमधून पाणी काढलं, महिलेचा देशी जुगाड पाहून लोक म्हणाले, बाई..तूच खरी इंजिनिअर..
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मार्गही नीटनेटका करण्यात आला होता. खुद्द उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या नियोजनाची प्रशंसा केली. या स्पर्धेसाठी थार ,फॉर्च्यूनर , 6 ट्रक्टर, आणि 150 दुचाकी बक्षिसे म्हणून देण्यात आली आहेत. या शर्यतीनिमित्त या बैलगाडी शर्यतीच्या परिसराला जत्रेचे स्वरूप आलं होतं. हजारो खाद्यपदार्थांचे छोटे-मोठे स्टॉल, या शरीराच्या परिसरात या मार्गावर मनेराजुरी तासगाव जवळपास दहा किलोमीटरच्या क्षेत्रात हजारो वाहनाने व्यापून गेला होता. पैलवान चंद्रहार पाटील यांच्याकडून नवशेहून अधिक स्वयंसेवक वाहतूक व्यवस्थेसाठी आणि गर्दी नियंत्रण करण्यासाठी झटत होते. या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्पर्धा या निमित्ताने यशस्वी पार पडलेल्या आहेत. 2026 साठी BMW कार ही बैलगाडी शर्यती जाहीर करण्यात आली आहे.