जाहिरात

280 km उड्डाणाचा रेकॉर्ड..परदेशी तरुणाचा अपघात, मनालीच्या डोंगरात पॅराग्लायडिंगची क्रॅश लँडिंग, पाहा काय घडलं?

Manali Paragliding Accident News :  हिमाचल प्रदेशातील जगप्रसिद्ध बीड़-बिलिंग पॅराग्लायडिंग घाटी सध्या पॅराग्लायडर्सनी भरलेली आहे. पण एका अपघातामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे.

280 km उड्डाणाचा रेकॉर्ड..परदेशी तरुणाचा अपघात, मनालीच्या डोंगरात पॅराग्लायडिंगची क्रॅश लँडिंग, पाहा काय घडलं?
Manali Paragliding News
मुंबई:

Manali Paragliding Accident News :  हिमाचल प्रदेशातील जगप्रसिद्ध बीड़-बिलिंग पॅराग्लायडिंग घाटी सध्या पॅराग्लायडर्सनी भरलेली आहे. संपूर्ण जगातून पायलट्स या साहसी अनुभवाचा आनंद घेण्यासाठी येथे तळ ठोकून आहेत. मात्र, जेव्हा धाडस घेतलं जातं, तेव्हा अपघातांची शक्यता देखील वाढते. अशीच एक ताजी घटना काल समोर आली, जेव्हा ऑस्ट्रियाचा पायलट फिलिपने तीन दिवसांपूर्वी आपल्या दोन मित्रांसोबत बिलिंग घाटीमधून उड्डाण घेतलं आणि धौलाधार पर्वतश्रेणी फिरण्याचा निर्णय घेतला.

तीन दिवस धौलाधार पर्वतश्रेणीतील विविध ठिकाणी लँडिंग करून दोन रात्री तिथेच घालवल्यानंतर तिसऱ्या दिवशी त्या पायलटचा समतोल बिघडला आणि शनिवारी दुपारी 3.30 वाजता त्याने मनालीजवळील रेनसुई येथे क्रॅश लँडिंग केली. या अपघातात तो गंभीर जखमी झाला. या घटनेची माहिती त्याच्या सहकारी पायलटने बीड़-बिलिंग पॅराग्लायडिंग असोसिएशनला दिली.

नक्की वाचा >> अनाया बांगर RCB कडून खेळणार? Video शेअर करत दिली मोठी अपडेट, सराव करताना मारले जबरदस्त शॉट्स

अपघात घडताच रेस्क्यू टीम हेलिकॉप्टरने पोहोचली अन्..

असोसिएशनने तात्काळ आपली रेस्क्यू टीम SAR ला बचावकार्याची जबाबदारी दिली आणि SAR ने तात्काळ हेलिकॉप्टरची व्यवस्था करून आज सकाळी ८ वाजता पायलटला मनालीच्या डोंगराळ भागातून सुरक्षितपणे बाहेर काढले. पायलटची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्याला हेलिकॉप्टरद्वारे चंदीगडमधील मॅक्स रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.

Latest and Breaking News on NDTV

नक्की वाचा >> Jugaad Video: मोटरशिवाय बोअरवेलमधून पाणी काढलं, महिलेचा देशी जुगाड पाहून लोक म्हणाले, बाई..तूच खरी इंजिनिअर..

ऑस्ट्रियाचा फिलिप हा जगातील सर्वोत्तम पॅराग्लायडिंग पायलटांपैकी एक मानला जातो आणि त्याच्या नावावर अनेक जागतिक विक्रम आहेत. बीड़-बिलिंगमध्येही आठ तासांत २८० किलोमीटर लांब उड्डाणाचा विक्रम त्याच्या नावावर आहे. फिलिप दरवर्षी जगातील सर्वोत्तम पॅराग्लायडिंग घाटीत या साहसी खेळाचा आनंद घेण्यासाठी येथे येतो.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com