मनोज जरांगेकडून नियमांचे उल्लंघन, पवार- ठाकरेंकडून मदत..', सदावर्तेंचा हायकोर्टात दावा

High Court On Manoj Jarange Patil Morcha:  एमी फाउंडेशनकडून ही याचिका दाखल करण्यात आली असून कोर्टाने सुट्टी रद्द करुन आजच या याचिकेवर तात्काळ सुनावणीही घेतली. 

जाहिरात
Read Time: 2 mins

Manoj Jarange  Patil Morcha Petition Hearing: मुंबईमध्ये सुरु असलेल्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनाबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण बेकायदेशीर असल्याचा आरोप करत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. एमी फाउंडेशनकडून ही याचिका दाखल करण्यात आली असून कोर्टाने सुट्टी रद्द करुन आजच या याचिकेवर तात्काळ सुनावणीही घेतली. 

गेल्या चार दिवसांपासून मुंबईमध्ये मराठा बांधवांचे आंदोलन सुरु आहे. एकीकडे मनोज जरांगे पाटील यांचे आझाद मैदानात उपोषणाला सुरु असतानाच इतर आंदोलकांनी विविध ठिकाणी गर्दी केली आहे. सामान्य नागरिकांना याचा त्रास होत असल्याचेही दिसत आहे.  यावरुनच मराठा आंदोलनाविरोधात  एमी फाऊंडेशनने हायकोर्टात धाव घेतली आहे. या याचिकेवर न्यायमूर्ती रविंद्र घुगे आणि गौतम अंखड यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली. 

Manoj Jarange Patil Mumbai Maratha Protest: महिला पत्रकारांसोबत गैरवर्तन, राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल

यावेळी महाधिवक्त्यांनी सर्व सामान्य मुंबईकरांना त्रास होत असल्याचा दावा केला. सामान्य मुंबईकरांना याचा त्रास होत आहे. संपूर्ण दक्षिण मुंबईमध्ये रस्ते जाम केले जात आहेत.  तसेच मनोज जरांगे यांच्या आंदोलनात अटी शर्थींचे उल्लंघन झाल्याचाही आरोप करण्यात आला आहे. मनोज जरांगेंच्या आंदोलनाला काही अटी शर्थींवर परवानगी दिली होती, मात्र त्या पाळल्या जात नाहीत. तसेच ठाकरे पवारांकडून या आंदोलनाला मदत होत आहे, असा दावा गुणरत्न सदावर्तेंनी केला आहे. 

महत्त्वाचं म्हणजे शनिवारी आणि रविवारी झालेले उपोषण विनापरवानगी होते. ध्वनीक्षेपकांचा विनापरवानगी वापर केला जात आहे. फक्त पाच हजार आंदोलकांनाच आंदोलनाची परवानगी होती. फक्त सहा वाजेपर्यंत परवानगी होती त्याचेही उल्लंघन केले गेले अशी माहितीही महाधिवक्त्यांनी कोर्टाला दिली. कोर्टाने याबाबतची परवानगी पडताळून पाहिली. 

Advertisement

Sumona Chakravarti: 'आंदोलकांनी कार अडवली, घाणेरडे चाळे अन्..' अभिनेत्रीने सांगितला भयावह अनुभव