जाहिरात

Hindustani Bhau VIDEO: माधुरी हत्तीणवरुन हिंदुस्थानी भाऊची शिवीगाळ, ठाकरे गटाचा कोल्हापुरी पायतणाने चोपण्याचा इशारा

सोशल मीडिया इन्फ्ल्यून्सर विकास पाठक म्हणजेच हिंदुस्थानी भाऊनेही उडी घेतली आहे. हिंदुस्थानी भाऊने वनताराचे समर्थन करत कोल्हापुरकरांना अश्लील शिवीगाळ केली आहे. 

Hindustani Bhau VIDEO: माधुरी हत्तीणवरुन हिंदुस्थानी भाऊची शिवीगाळ, ठाकरे गटाचा कोल्हापुरी पायतणाने चोपण्याचा इशारा

Hindustani Bhau:  कोल्हापूरकरांच्या लाडक्या माधुरी हत्तीण आणि वनतारा प्रकरण सध्या गाजत आहे. नांदणी गावातील माधुरी हत्तीणीला वनताराला पाठवल्यानंतर नांदणीकरांनी तिला परत आणण्यासाठी मोहिम उघडली आहे. सर्व कोल्हापूरकर माधुरीला परत आणण्यासाठी एकवटले असून राजकीय नेत्यांनीही यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. अशातच या वादात आता सोशल मीडिया इन्फ्ल्यून्सर विकास पाठक म्हणजेच हिंदुस्थानी भाऊनेही उडी घेतली आहे. हिंदुस्थानी भाऊने वनताराचे समर्थन करत कोल्हापुरकरांना अश्लील शिवीगाळ केली आहे. 

कोल्हापूरचा माधुरीचा मॅटर चालू आहे. मी त्याबाबत सर्व माहिती घेतली. तेव्हा समजलं की यावरुन मोठे राजकारण सुरु आहे. निवडणूका आल्यात त्यामुळे राजकारण होणारचं. एवढ्या वर्षात कोणताही नेता माधुरीला बघायल गेला होता का? हा एका मुक्या जिवाचा प्रश्न आहे. २०१७ मध्ये माधुरीने महंतांवर हल्ला केला होता, तेव्हा राजू शेट्टींनीच वनविभागाला पत्र लिहून हत्ती घेऊन जाण्यास सांगितले होते, असा खुलासा त्याने केला आहे.

तसेच पेटा या संस्थेने हत्तीणीबाबत पत्र लिहिलं होतं. त्यानंतर हायकोर्टाने  हिला चांगल्या जागी, जिथे तिची देखभाल होईल अशा ठिकाणी जा, असे निर्देश दिले होते. मात्र तुम्ही विरोध करता,  'अरे थोडी अक्कल लावा रे.. जेवताना तुम्ही @# तर नाही खात? थोडे डोके वापरा. कोणच्याही आहारी जाऊ नका, अशी अश्लील भाषाही त्याने वापरली आहे. 

दरम्यान, हिंदुस्थानी भाऊच्या या व्हिडिओवरुन राज्यभरात संताप व्यक्त केला आहे. मुंबईतील ठाकरेंच्या शिवसैनिकाने कोल्हापूर वासियांचा अपमान करणाऱ्या  विकास पाठकला कोल्हापुरी पायताणाने चोपणार म्हणजे चोपणार असा विडा उचलला आहे. महाराष्ट्राचा आणि कोल्हापूरवासियांचा अपमान करण्याऱ्या परप्रांतीयाला धडा शिकवणार असा इशारा प्रशांत भिसे यांनी दिला आहे. विकास पाठक तू आता तयार रहा,  तुला चोपणार म्हणजे चोपणारच कोल्हापुरी हिसका काय असतो तो तुला दाखवतो, कोल्हापुरी पायताणानेच तुला चोपणार' असं भिसे यांनी म्हटलं आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com