Hingoli News: संतापजनक! 5 दिवसांचे अर्भक झुडपात फेकलं, निर्दयी माता- पित्याचा शोध सुरु

स्टेट बँकेसमोरील महसूल विभागाच्या निवासस्थानाजवळ ही घटना उघडकीस आली. माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या घटनेने संपूर्ण शहरात संतापाची लाट पसरली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Hingoli Crime: हिंगोली शहरात एका पाच दिवसांच्या नवजात अर्भकाला कोणीतरी अज्ञात व्यक्तीने काटेरी झुडपात फेकून दिल्याची धक्कादायक घटना आज उघडकीस आली. भारतीय स्टेट बँकेच्या समोरील महसूल विभागाच्या निवासस्थानाजवळ ही घटना घडली. नागरिकांच्या सतर्कतेमुळे या निरागस बालकाचे प्राण वाचले आहेत.

Mumbai News : मुंबइतील 'ही' ठिकाणे मृत्यूच्या छायेत, कुठे कुठे कोसळू शकतात दरडी? पाहा BMC ने जारी केलेली लिस्ट

Advertisement

पाच दिवसांच्या बालकाला झुडपात फेकलं 

याबाबत सविस्तर माहिती अशी की, हिंगोली शहरातील हृदयद्रावक घटनेत एका पाच दिवसांच्या नवजात बालकाला निर्दयीपणे काटेरी झुडपात फेकून देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या भारतीय स्टेट बँकेसमोरील महसूल विभागाच्या निवासस्थानाजवळ ही घटना उघडकीस आली. माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या घटनेने संपूर्ण शहरात संतापाची लाट पसरली आहे.

​ठिकाणी काटेरी झुडपांमधून बालकाच्या रडण्याचा आवाज येत असल्याने परिसरातील काही सतर्क नागरिकांचे लक्ष वेधले गेले. नागरिकांनी तात्काळ धाव घेऊन पाहणी केली असता, त्यांना कपड्यांत गुंडाळलेले आणि काट्यांमध्ये पडलेले ते नवजात अर्भक आढळून आले. उपस्थितांनी तत्काळ हिंगोली शहर पोलिसांना पाचारण केले. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तातडीने धाव घेतली आणि बालकाला ताब्यात घेऊन उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले.

डॉक्टरांच्या देखरेखीखाली बालकावर उपचार सुरू असून, त्याची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, पाच दिवसांच्या या अर्भकाला अशा पद्धतीने बेवारस अवस्थेत टाकणाऱ्या त्या नराधम पालकांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. हिंगोली शहर पोलीस ठाण्याचे पथक या प्रकरणाचा सखोल तपास करत असून, आसपासच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जात आहे.

Cancer Alert: फक्त 3 सवयी बदला आणि कॅन्सरचा धोका 50% कमी! डॉक्टरांनी सांगितलेला 'हा' फॉर्म्युला नक्की काय आहे?