Hingoli News: गर्भवती महिलेला रूग्णवाहीका नाकारली, दिड तास ताटकळत बसली, कारण ऐकून दाहकता समजेल

अत्यावश्यक सेवा असलेल्या या वाहनांना तरी पेट्रोल डिझेल मिळेल याची काही सोय केली जाणार आहे की नाही अशी विचारणा आता होवू लागली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
वाचा
Summary is AI-generated, newsroom-reviewed
  • हिंगोलीत गर्भवती महिलेला डिझेल नसल्यामुळे शासकीय रुग्णवाहीका नाकारण्यात आली होती
  • महिलेच्या कुटुंबीयांनी 108 आणि 102 रुग्णवाहिका क्रमांकांवर संपर्क केला तरीही डिझेल अभावामुळे सेवा मिळाली नाही
  • दिड तास थांबून शेवटी खाजगी गाडीने महिलेला रुग्णालयात हलवण्यात आले
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.
हिंगोली:

एक धक्कादायक आणि तितकीच गंभीर घटना हिंगोलीत घडली आहे. इथं एका गर्भवती महिलेला रुग्णवाहीका नाकारण्यात आली. त्यामागचं कारण होतं डिझले. या रुग्णवाहीकेत डिझेल नाही त्यामुळे ती देता येणार नाही असं रुग्णालयाकडून सांगण्यात आलं. अशा परिस्थितीत या गर्भवती महिला आणि तिच्या कुटुंबासमोर मोठा प्रश्न निर्माण झाला. 108 क्रमांकावर फोन केला. पण तिथे रुग्णवाहीका मिळेल पण दिड तास लागे असं सांगितलं गेलं. गरीब कुटुंबातील या महिलेला अखेर दिड तासानंतर खाजगी गाडीने रुग्णालयात हलवण्यात आलं. यातून ग्रामिण भागात पेट्रोल डिझेलचा प्रश्न किती गंभीर बनला आहे त्याचे हे जिवंत उदाहरण म्हणावे लागेल. 

डिझेल अभावी गर्भवती महिलेला रुग्णवाहिका नाकारल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हिंगोलीच्या औंढा नागनाथ तालुक्यातील नालेगाव येथील मनीषा इंगळे या गर्भवती महिलेला शासकीय रुग्णवाहिका मिळाली नाही. त्यामुळे त्यांना भाड्याने खाजगी रुग्णवाहिकेद्वारे हिंगोलीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात जावे लागले. डिझेल नसल्यामुळे त्यांच्यावर ही वेळ आली. गर्भवती महिलेला प्रसूती वेदना होत होत्या. त्यामुळे त्यांना जवळाबाजार येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आलं होतं. मात्र या गर्भवती महिलेची प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरांनी त्यांना पुढील उपचारासाठी हिंगोलीच्या रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला. 

Advertisement

नक्की वाचा - NCP Meeting: राष्ट्रवादीच्या बैठकीत हायव्होल्टेज ड्रामा! भुजबळ-तटकरे भिडले, पार्थ पवार तडकाफडकी बाहेर पडले

हिंगोलीत जाण्यासाठी त्यांना रुग्णवाहीकेची गरज होती. त्यासाठी महिलेच्या कुटुंबीयांनी 108 आणि 102 या क्रमांकाच्या रुग्णवाहिकाना संपर्क केला. मात्र रुग्णवाहीकेच डिझेल नाही. त्यामुळे रुग्णवाहीका देता येणार नाही असं सांगण्यात आलं. असा आरोप या गर्भवती महिलेच्या कुटुंबीयांनी केला आहे. महिलेची स्थिती खालावत होती. आम्ही गरीब माणसं खाजगी गाडी कुठून करणार. आम्ही रुग्णवाहीकेसाठी जवळपास दिड तास थांबलो. त्या वेळेत जर आपल्या मुलीला काही झालं असतं तर त्याला जबाबदार कोण असा प्रश्न गर्भवती महिलेच्या आईने उपस्थित केला आहे. 

नक्की वाचा - NCP News: शरद पवारांना मोठा धक्का! बडा नेता अन् माजी मंत्री भाजपच्या गळाला, अहिल्यानगरमधील राजकारण बदलणार?

राज्यातल्या ग्रामिण भागात  मोठ्या प्रमाणात इंधन टंचाई आहे. पेट्रोल पंपावर पेट्रोल डिझेल मिळत नाही ही स्थिती आहेत. त्याचाच फटका सर्व सामान्यांना बसत आहे. रुग्णवाहीकेत डिझेल नसल्यामुळे ती रुग्णाला देता आला नाही. ही भयाण स्थिती म्हणावी लागेल. जर का त्या महिलेचं बरं वाईट झालं असतं तर त्याला जबाबदार कोण असतं असा ही प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवा असलेल्या या वाहनांना तरी पेट्रोल डिझेल मिळेल याची काही सोय केली जाणार आहे की नाही अशी विचारणा आता होवू लागली आहे.