Hingoli Crime: महिला कर्मचाऱ्याचा प्रताप! शासकीय निधी स्वतःच्या बँक खात्यात जमा, असा फसला प्लॅन

बँकेला संशय आल्याने धनादेश जिल्हा परिषदेला परत करण्यात आला असून या महिलेला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins

हिंगोली: हिंगोलीत शासकीय निधीचा चेक स्वतःच्या बँक खात्यात जमा केल्याचा धक्कादायक प्रकार हिंगोलीमध्ये उघडकीस आला आहे. हिंगोली जिल्हा परिषदेत सहाय्यक लेखाधिकारी असलेल्या महिला कर्मचाऱ्याने हा प्रताप केला. मात्र बँकेला संशय आल्याने धनादेश जिल्हा परिषदेला परत करण्यात आला असून या महिलेला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

याबाबत सविस्तर माहिती अशी की, हिंगोली जिल्हा परिषदेत कार्यरत सहाय्यक लेखाधिकारी महिलेने सेवाशुल्काच्या रकमेचा शासकीय धनादेश पंचायत समितीच्या खात्यात न लिहिता  वैयक्तिक स्वतःच्या नावे लिहून स्वतःच्या खात्यात जमा केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. बँकेत चेक तपासणीमध्ये बँक अधिकाऱ्यांना संशय आल्यामुळे त्यांनी जिल्हा परिषदेला हा धनादेश परत करत याविषयी कळविले.

त्यामुळे हा आर्थिक गैव्यवहार होत असल्याचा प्रकार उघड झाले आहे. तब्बल एक लाख 55 हजार रुपयांचा हा धनादेश आहे.  जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाकडून सेवाशुल्काची ही रक्कम पंचायत समितीला धनादेशाद्वारे पंचायत समितीच्या खात्यात वितरित केली जाते. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या सहीने हा धनादेश काढला जातो. परंतु या धनादेशावर असणाऱ्या तत्कालीन जिल्हा परिषद सिईओंच्या सहीमध्ये देखील तफावत असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

Beed Crime: आणखी एक वैष्णवी! पैशासाठी सुनेचा छळ, बीडमध्ये विवाहितेने आयुष्य संपवलं

त्यामुळे या सहाय्यक लेखाधिकारी महिलेने बनावट स्वाक्षरी करून हा धनादेश स्वतःच्या खात्यात जमा केला की काय असा संशय उपस्थित केला जात आहे.याप्रकरणी सखोल चौकशी करण्यात येत असून सहाय्यक लेखाधिकारी सोनल चंद्रकांत जावळे यांना अंतिम कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे आणि सर्व धनादेश, कागदपत्रांसह या महिला कर्मचाऱ्याला चौकशीसाठी हजर राहण्यासाठी नोटीस बजावण्यात आली आहे.

Advertisement