Nashik Trimbakeshwar Shivling Video Viral : प्रसिद्ध ज्योतिर्लिंगांपैकी एक..श्री त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात अत्यंत दुर्मिळ आणि ऐतिहासिक घटना घडली. अनेक वर्षानंतर श्री त्र्यंबकेश्वर महादेव मंदिर परिसरात असलेल्या ऐतिहासिक अमृतकुंडच्या तळाशी एका शिवलिंग आढळलं. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण ASI च्या माहितीनुसार, अमृतकुंडचं पाणी काढून ते स्वच्छ करण्यात आलं आहे.साफसफाई वेळी कुंडाच्या तळाशी असलेला शिवलिंग स्पष्टपणे पाहायला मिळाला.त्यानंतर भाविकांमध्ये आणि मंदिर प्रशासनात मोठा उत्साह पाहायला मिळाला.
शिवलिंगचं हा दुर्मिळ क्षण तेव्हा समोर आला, जेव्हा भारतीय पुरातत्व विभागाने सर्वेक्षण केलं आणि अमृतकुंडचं पाणी बाहेर काढून त्याची साफसफाई केली. जसजसं कुंडातील पाणी पूर्णपणे खाली झालं,त्याच्या तळाशी असलेलं प्राचीन शिवलिंग पूर्णपणे स्पष्ट दिसू लागला.
60 फूट खोल अमृतकुंड
60 फूट खोल अमृतकुंड पेशवकालीन असल्याचं मानलं जातं. या कुंडाला धार्मिकरित्या खूप महत्त्व आहे.कारण याच अमृतकुंडच्या पवित्र पाण्याचा उपयोग श्री त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगची नियमित पूजा आणि अभिषेकसाठी केला जातो.
नक्की वाचा >> KDMC मुख्यालयावर धडक मोर्चा, खासदार श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी, नेमकं प्रकरण काय?
अमृतकुंडात प्रवेश बंदी
सुरक्षेचा मुद्दा लक्षात घेता, सामान्य भाविकांना अमृतकुंडमध्ये प्रवेश बंदी आहे. या अमृतकुंडाला खूप सुरक्षित ठेवण्यात आलं आहे.खूप वर्षानंतर झालेलं हे दुर्मिळ आणि अलौकिक दर्शनाने मंदिर प्रशासन आणि अधिकाऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
त्र्यंबकेश्वर मंदिराचा इतिहास
'त्र्यंबक' शब्दाचा अर्थ तीन देवता, ब्रम्हा,विष्णु आणि महेश असा होतो. महाराष्ट्राच्या नाशिक शहरापासून जवळपास 28 किमी दूर शंकराचं त्र्यंबकेश्वर हे प्रसिद्ध ज्योतिर्लिंग आहे. हे महादेवाच्या 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक मानलं जातं.मंदिराजवळ ब्रम्हगिरी पर्वत आहे. ज्याला पवित्र गंगा नदीचं उगमस्थान मानलं जातं. इथे कुशावर्त कुंड नावाचं एक पवित्र तलावही आहे.कुशावर्त कुंडाची निर्मिती श्रीमंत सरदार रावसाहेब पार्नेकर यांनी केली होती.सध्याच्या त्र्यंबकेश्वर मंदिराची निर्मिती श्रीमंत नानासाहेब पेशवा यांनी 1755 ते 1786 दरम्यान केली होती. हे मंदिर ब्रम्हगिरी पर्वताच्या पायथ्याशी स्थित आहे.