Holi 2026: लाडक्या जावयाची गाढवावरुन वरात! डीजेचा दणदणाट अन् रंगाची उधळण, 90 वर्षांपासूनची अनोखी परंपरा

धुलीवंदनाच्या दिवशी या जावयाचा सन्मान अगदी वेगळ्याच पद्धतीने केला जातो. कारण इथे जावयाला थेट गाढवावर बसवून त्याची वाजत-गाजत मिरवणूक काढली जाते. 

जाहिरात
Read Time: 2 mins

आकाश सावंत, बीड:

Beed Donkey Ride Holi:  राज्यभरात होळी तसेच धुलीवंदनाचा सण मोठ्या उत्साहात पार पडत आहे. राज्यात विविध भागात होळी सण साजरा करण्याच्या वेगवेगळ्या रुढी, परंपरा आहेत. बीड जिल्ह्यातील विडा गावात धुळवडीची अशीच अनोखी परंपरा आहे. धुळवडीच्या दिवशी घरजावयाची गाढवावरुन वरात काढली जाते. गर्दभ स्वारी असं त्याला म्हणतात. यंदाही ही अनोखी परंपरा मोठ्या उत्साहात पार पडली. 

लाडक्या जावयाची गाढवावरुन धींड

याबाबत सविस्तर माहिती अशी की,  सासरवाडीत जावयाचा मान, सन्मान आणि राजासारखा सत्कार.. ही परंपरा आपल्याला सर्वत्र पाहायला मिळते. पण बीडच्या केज तालुक्यातील विडा गावात धुलीवंदनाच्या दिवशी या जावयाचा सन्मान अगदी वेगळ्याच पद्धतीने केला जातो. कारण इथे जावयाला थेट गाढवावर बसवून त्याची वाजत-गाजत मिरवणूक काढली जाते. 

Gulf War Effect: कृषी निर्यातीला युद्धाची धग! केळी- कांद्याचे 1000 कंटेनर अडकले; बळीराजा अडचणीत

तब्बल 90 वर्षांपासून सुरू असलेली ही अनोखी परंपरा आजही तितक्याच उत्साहात जपली जाते. गावकरी दोन दिवस आधीपासून जावयाचा शोध घेतात आणि धुलीवंदनाच्या दिवशी त्याला गाठून गाढवावर बसवतात. यंदाच्या वर्षी मात्र गेल्या साठ वर्षापासून गावकऱ्यांना चकवा देणारे जाधवजवळा गावचे रहिवासी शिवाजी गालफाडे यांना विडा ग्रामस्थांनी  ढोल-ताशांच्या गजरात गाढवावर बसून संपूर्ण गावातून मिरवणूक काढली जातेय. थट्टा, मस्करी आणि उत्साहात जावयाचा सन्मान करणारी ही परंपरा सध्या सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

९० वर्षांची परंपरा

दरवर्षीप्रमाणे यंदाही जावयाला शोधण्यासाठी गावातील तरुणांची तीन पथके तैनात करण्यात आली होती. अनेक जावई पळून गेले, कुणी उसात लपले. त्यांना पकडण्याच्या नादात गावचे सरपंच जखमीही झाले. अखेर  शिवाजी गालफाडे यांना गावकऱ्यांनी गाठलं अन् गर्दभ स्वारीला तयार केलं. गालफाडे मामा हे घरामध्ये बसले असले असतानाच गावातील तरुण पोरांनी त्यांना गाठलं अन् धिंड काढायला घेऊन गेले. 

Advertisement

Mumbai ATS Raid: ब्रेकिंग! मुंबईत 4 ठिकाणी ATSची छापेमारी, चौघे ताब्यात; दहशतवादी कनेक्शनचा संशय

Topics mentioned in this article