जाहिरात

Mumbai ATS Raid: ब्रेकिंग! मुंबईत 4 ठिकाणी ATSची छापेमारी, चौघे ताब्यात; दहशतवादी कनेक्शनचा संशय

मुंबई शहरातील कुर्ला तसेच गोवंडी या अत्यंत गर्दीच्या ठिकाणी एटीएसने छापेमारी केली आहे. या कारवाईने शहरात खळबळ उडाली आहे. 

Mumbai ATS Raid: ब्रेकिंग! मुंबईत 4 ठिकाणी ATSची छापेमारी, चौघे ताब्यात; दहशतवादी कनेक्शनचा संशय

Mumbai ATS Raid:  देशभरात होळीचा सण मोठ्यात उत्सवात साजरा होत आहे. राज्यातही होळीचा उत्साह सुरु असतानाच मुंबईमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. मुंबईमध्ये  महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने मोठी कारवाई केली आहे. मुंबई शहरातील कुर्ला तसेच गोवंडी या अत्यंत गर्दीच्या ठिकाणी एटीएसने छापेमारी केली आहे. या कारवाईने शहरात खळबळ उडाली आहे. 

मुंबईत एटीएसची मोठी कारवाई!

याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार,  महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथक म्हणजेच एटीएसने मुंबईमध्ये चार ठिकाणी छापेमारी केली आहे. गोवंडी आणि कुर्ला या शहरातील अत्यंत गर्दीच्या ठिकाणांवर ही छापेमारी करण्यात आली आहे. गोवंडीमध्ये तीन ठिकाणी तर कुर्ल्यात एका ठिकाणी ही छापेमारी करण्यात आली. या कारवाईमध्ये चार संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. या चौघांचा दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

Nashik News: नाशिक हादरलं! दोन मुलींचे वेगवेगळ्या ठिकाणांहून अपहरण, पालक चिंतेत

कुर्ला, गोवंडीमध्ये छापेमारी

सुत्रांच्या माहितीनुसार, दहशतवादी संघटनेच्या कथित ऑनलाइन प्रचारासंदर्भात महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने मुंबईतील तीन ठिकाणी मोठे छापे केले. ही कारवाई काल रात्री संध्याकाळी सुरू झाली असून मध्यरात्री रात्री उशिरापर्यंत सुरू होती. छाप्यांमध्ये मोबाईल फोन आणि लॅपटॉपसह असंख्य इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त करण्यात आली आणि अनेक लोकांची चौकशी करण्यात येत आहे.  

डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे कट्टरपंथी विचारांचा प्रसार आणि वापर करण्यात काही विशिष्ट व्यक्तींचा सहभाग असल्याचे इनपुटमधून असल्याच्या संशयावरून हे छापे टाकण्यात आले. ताब्यात घेतलेल्या तरुणांचा देशविघातक कृत्ये प्रतिबंधक कायद्याअतंर्गत बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याचा संशय आहे. तसेच  ताब्यात घेतलेल्यांचे दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याचे सबळ पुरावे एटीएसला सापडल्याची माहितीही समोर आली आहे. 

Lunar Eclipse: भाविकांनो लक्ष द्या! चंद्रग्रहणामुळे शेगाव, पंढरपुर मंदिर दर्शनात मोठा बदल; 'ही' देवस्थाने बंद

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com