Whatsapp वर मिळतील PAN कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्ससह महत्त्वाची कागदपत्रे; वाचा सविस्तर

जर तुमची कागदपत्रे आधीच तुमच्या Digilocker अकाउंटमध्ये सेव्ह असतील, तर सिस्टम तुमच्या आधार-लिंक्ड मोबाईल नंबर आणि ऑथेंटिकेशनद्वारे ते कागदपत्र तुम्हाला थेट WhatsApp वर पाठवेल.

जाहिरात
Read Time: 2 mins

भारत सरकारने आता नागरिकांच्या सोयीसाठी मोठे पाऊल उचलले आहे. भारत सरकारने MyGov आणि WhatsApp यांच्यात भागीदारी करून Digilocker सेवा थेट मेसेजिंग ॲपवर उपलब्ध करून दिली आहे. या सेवेचा मुख्य उद्देश सामान्य नागरिकांना त्यांची आवश्यक सरकारी कागदपत्रे, जसे की PAN कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, वाहन नोंदणी प्रमाणपत्र (RC), इन्शुरन्स पॉलिसी किंवा शैक्षणिक प्रमाणपत्रे अगदी सहजपणे त्यांच्या मोबाईलवर उपलब्ध करून देणे आहे. याचा अर्थ, आता ही कागदपत्रे मिळवण्यासाठी तुम्हाला वेगळे Digilocker ॲप उघडण्याची किंवा वेबसाइटवर जाण्याची गरज नाही.

सरकारच्या म्हणण्यानुसार, WhatsApp वरील MyGov Helpdesk हे नागरिकांसाठी प्रशासन आणि डिजिटल सेवांना अधिक सुलभ, पारदर्शक आणि सोपे बनवण्याचे एक महत्त्वाचे माध्यम आहे. Digital India च्या "Ease of Living" या मिशनचा हा एक भाग आहे, जेणेकरून आवश्यक कागदपत्रे प्रत्येकाला सहज उपलब्ध व्हावीत.

(नक्की वाचा-  Dadasaheb Bhagat : ऑफिस बॉय ते CEO; दहावी पास तरुणाने उभारली कोट्यवधींची कंपनी)

WhatsApp वर Digilocker वापरण्याची सोपी पद्धत

  • सर्वप्रथम WhatsApp क्रमांक 9013151515 तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करा. हा MyGov Helpdesk चा अधिकृत क्रमांक आहे.
  • तुमचे WhatsApp उघडा आणि या नंबरवर “Namaste” किंवा “Hi” किंवा “Digilocker” असा कोणताही मेसेज लिहून पाठवा.
  • काही वेळातच तुम्हाला MyGov Helpdesk कडून एक ऑटो-रिप्लाय मिळेल, ज्यात उपलब्ध सेवांची यादी असेल.
  • तुम्हाला ज्या सेवेची गरज आहे, उदा. PAN कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स किंवा वाहन RC, त्या सेवेचा क्रमांक मेसेजमध्ये टाईप करून पाठवा.

जर तुमची कागदपत्रे आधीच तुमच्या Digilocker अकाउंटमध्ये सेव्ह असतील, तर सिस्टम तुमच्या आधार-लिंक्ड मोबाईल नंबर आणि ऑथेंटिकेशनद्वारे ते कागदपत्र तुम्हाला थेट WhatsApp वर पाठवेल.

(नक्की वाचा-  Ola Shakti:'ओला शक्ती' लॉन्च! विजेशिवाय चालणार AC, फ्रिजसारखी उपकरणे; पाहा किंमत)

WhatsApp वर कोणते महत्त्वाचे डॉक्युमेंट्स मिळतील?

  • PAN कार्ड
  • ड्रायव्हिंग लायसन्स
  • वाहन नोंदणी प्रमाणपत्र (RC)
  • इन्शुरन्स पॉलिसी
  • CBSE 10वी आणि 12वीची मार्कशीट
  • CBSE उत्तीर्ण प्रमाणपत्र
  • जीवन/नॉन-लाइफ इन्शुरन्स डॉक्युमेंट्स

मात्र ही कागदपत्रे केवळ अशा लोकांनाच मिळतील, ज्यांनी ती आधीच त्यांच्या Digilocker अकाउंटमध्ये सेव्ह करून ठेवली आहेत. Digilocker ॲप Android आणि iOS दोन्ही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे.

Advertisement

Topics mentioned in this article