दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. दहावी आणि बारावीचा महाराष्ट्र बोर्डाचा निकाल लवकरच जाहीर होणार आहे. 'राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या निकालाचे कामकाज अंतिम टप्प्यात आले असून लवकरच निकाल जाहीर केले जाणार आहे. परिणामी विद्यार्थ्यांची धडधड वाढली आहे. बोर्डाची परीक्षा हा कोणत्याही विद्यार्थ्याच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा असतो. या परीक्षांसाठी विद्यार्थी जीव तोडून मेहनत करीत असतात. अखेर त्यांच्या या मेहनतीला यश मिळणार आहे.
(NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मिळालेल्या माहितीनुसार, येत्या 15 मेपर्यंत दोन्ही परीक्षांचे निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. सध्या सर्व विभागीय मंडळांच्या निकालाचा एकत्रित आढावा घेण्याचे काम सुरू आहे. साधारणपणे 5 ते 10 जून या कालावधीत बारावीचा निकाल जाहीर होईल, तर 15 मेपर्यंत दहावीचा निकाल जाहीर होणार आहे.
नक्की वाचा - NEET UG 2025: महत्त्वाचं! NEET UG परीक्षेसाठी ड्रेसकोड बंधनकारक! शूज, जीन्सवर बंदी, वाचा सविस्तर
निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा... (mahresult.nic.in)
21 लाख विद्यार्थी निकालाच्या प्रतीक्षेत...
यंदाच्या वर्षी 21 फेब्रुवारी ते 17 मार्च या दरम्यान दहावीच्या परीक्षा पार पडल्या होत्या. यावेळी 16 लाख 11 हजार 610 विद्यार्थी परीक्षेला बसले. यामध्ये तब्बल 8 लाख मुलं, 7 लाख मुली आणि 19 ट्रान्सजेंडर विद्यार्थी होते. तर 11 फेब्रुवारी ते 11 मार्च यादरम्यान बारावीच्या विविध शाखेतील परीक्षा पार पडल्या होत्या. यावेळी दहा लाख विद्यार्थी परीक्षेला बसल्याची माहिती आहे. त्यामुळे सुरुवातीला बारावीच्या परीक्षेचा निकाल लागेल त्यानंतर दहावीचे निकाल समोर येतील.