HSRP Number Plate: 'एचएसआरपी' प्लेट अद्याप बसवली नाही? राज्य सरकारचा मोठा दिलासा, वाचा नवी मुदतवाढ आणि नियम

जाहिरात
Read Time: 2 mins
HSRP Number Plate: तुम्ही आजवर ही प्लेट बसवली नसेल तर घाबरण्याचं कारण नाही.
मुंबई:

HSRP Number Plate Last Date : राज्यात हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (HSRP) प्लेट्स बसवण्यासाठीची अंतिम मुदत 15 ऑगस्ट, 2025 रोजी संपणार होती. मुदतीनंतर नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांना ₹10,000 पर्यंत दंड (HSRP fine Maharashtra)  भरावा  लागणार असल्यानं वाहनचालकांची धावपळ उडाली होती. तुम्ही आजवर HSRP प्लेट बसवली नसेल तर घाबरण्याचं कारण नाही. राज्य सरकारनं याबाबत मोठा दिलासा दिला आहे. राज्य सरकारनं याबाबतची मुदत 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत वाढवली आहे. 

का दिली मुदतवाढ?

1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी केलेल्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक म्हणजेच HSRP प्लेट बसवण्यासाठी वाहन मालकांकडून अल्प प्रतिसाद मिळाल्याने ही मुदतवाढ देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. 

वाहन मालकांनी वाहनांवर HSRP प्लेट बसवण्यासाठी परिवहन विभागाच्या http://transport.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जाऊन याबाबत 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत अपॉईंटमेंट घ्यावी. त्यानंतर उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी (एचएसआरपी) न बसविणाऱ्या वाहनांवर 1 डिसेंबर 2025 नंतर वायुवेग पथकाद्वारे नियमांनुसार कारवाई करण्यात येणार आहे. 

( नक्की वाचा : HSRP Update: जुन्या वाहनांसाठी HSRP प्लेट लावण्यासाठी महाराष्ट्रासह 20 राज्यांमध्ये हे दर निश्चित  )
 

पण, 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत एचएसआरपी बसविण्यासाठी अपॉइंटमेंट मिळालेल्या वाहनांवर कोणतीही कारवाई करण्यात येणार नाही, याची सर्व संबंधित वाहन मालकांनी नोंद घ्यावी, तरी एक एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी असलेल्या वाहनधारकांनी उच्च सुरक्षा क्रमांक पाटी वाहनावर बसविण्यात यावी, असे आवाहन सहपरिवहन आयुक्त शैलेश कामत यांनी केले आहे.

Advertisement

HSRP प्लेट आवश्यक का?

हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (HSRP) ही भारत सरकारने वाहनांची सुरक्षा आणि ओळख वाढविण्यासाठी लागू केलेली एक अनिवार्य नंबर प्लेट आहे. HSRP ही एक विशेष प्रकारची नंबर प्लेट आहे, ज्यावर एक सिरीयल नंबर आणि त्यावर न काढता येणारा लॉक असतो. ही नंबर प्लेट चोरी, वाहन ट्रॅकिंग आणि इतर सुरक्षेच्या कारणांसाठी महत्त्वाची आहे. भारतातील सर्व नवीन आणि जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट असणे अनिवार्य आहे.
 

Topics mentioned in this article