Soybean Price Hike : राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकरी सोयाबीनच्या भाववाढीची मागणी करीत आहे. शेतकऱ्यांकडून हवीभावाची मागणी केली जात असताना एक मोठी बातमी समोर आली आहे.
राष्ट्रीय स्तरावर सोयाबीनच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. त्याचा सकारात्मक परिणाम दरावर दिसून येत अवघ्या दोन दिवसांत सीड कॉलिटी सोयाबीनचे दर एक हजाराने वाढले आहेत, तर मील क्वालिटीच्या दरातही मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे सोयाबीनचे दर हमी भावाचा टप्पा ओलांडण्याची शक्यता बाजार तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
मागील काही दिवसांपासून राज्यातील बाजार समित्यांमध्ये सोयाबीनची आवक कमी होत असताना मागणी वाढत आहे. सद्यःस्थितीत सोयाबीन तेलाची मागणी वाढली आहे. त्यामुळे प्रक्रिया उद्योगांकडून खरेदीत वाढ करण्यात आली आहे. दुसरीकडे यंदा खरिपात सोयाबीनचा पेरा कमी झाला आहे. त्यातच नाफेडची सोयाबीन खरेदी आता सुरू झाली आहे. त्यामुळे दराला आधार मिळत आहे.
नक्की वाचा - Viral Video: ट्रेनमध्ये होतेय दारूची खुलेआम विक्री, गुटखा, पानमसाला सोबत मिळतय बरच काही
सोयाबीनचे दर दोनच दिवसांत दीड हजारांनी वाढले असून, मील क्वालिटी सोयाबीनही पाच हजारांपर्यंत पोहोचले आहेत. वाशिम बाजार समितीत दोन दिवसांपूर्वी बिजवाई सोयाबीनला ५ हजार ८०० रुपये प्रती क्विंटलपर्यंतचा दर मिळाला होता.