जाहिरात

Mumbai Air Quality Report: मायानगरी मुंबईची हवा शुद्ध, प्रदूषण पातळीत 44 टक्क्यांनी घट, वाचा रिपोर्ट

Mumbai's Air Quality Report:नव्या सर्व्हेनुसार मुंबईच्या हवेची गुणवत्ता पातळी सुधारल्याचे समोर आले आहे. मुंबईच्या हवामान पातळीत सुधारणा झाल्याचे सरकारी आकडेवारीतून समोर आलं आहे.

Mumbai Air Quality Report: मायानगरी मुंबईची हवा शुद्ध, प्रदूषण पातळीत 44 टक्क्यांनी घट, वाचा रिपोर्ट

विशाल पाटील, मुंबई:

Mumbai's air Quality Report: वाढती लोकसंख्या, वाहनांची गर्दी, दिवसेंदिवस बदलणारे हवामान यामुळे मायानगरी मुंबईची हवा प्रदूषित होत आहे. त्यामुळे मुंबईकरांना आरोग्याच्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. मात्र आता नव्या सर्व्हेनुसार मुंबईच्या हवेची गुणवत्ता पातळी सुधारल्याचे समोर आले आहे. मुंबईच्या हवामान पातळीत सुधारणा झाल्याचे सरकारी आकडेवारीतून समोर आलं आहे.

याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार, राज्याची राजधानी मुंबईच्या हवामान पातळीत सुधारणा झाल्याचे सरकारी आकडेवारीतून समोर आले आहे. देशात राष्ट्रीय कार्यक्रम अंतर्गत येणाऱ्या 130 शहरांपैकी 103 शहरांमध्ये 2017 -18च्या तुलनेत 2024 आणि 25 मध्ये पीएम 10च्या पातळीत सुधारणा झाली आहे.यामध्ये मुंबईच्या प्रदूषण पातळीत  44 टक्के घट नोंदविण्यात आली आहे.

Skin Care : त्वचेच्या काळजीसाठी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सना फॉलो करावं का? तज्ज्ञांनी सांगितलं...

मुंबईनंतर या यादीत कोलकत्ता शहराचा समावेश आहे. तर दिल्लीत 15 टक्के आणि चेन्नईत 12 टक्के प्रदूषण पातळीत घट झाली आहे. वाढते प्रदूषण आणि आरोग्याची चिंता यावर खासदार अनिल देसाई आणि बाबुसिंग कुशवाह यांनी हा प्रश्न पावसाळी संसदीय अधिवेशनात उपस्थित केला होता.

 उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय पर्यावरण राज्यमंत्री कीर्ती वर्धन सिंह यांनी ही आकडेवारी सादर केली.आकडेवारीनुसार पीएम 10 च्या पातळीत देशाच्या 64 शहरात 20 टक्क्यांहून अधिक  घट तर 25 शहरांमध्ये 40 टक्क्यांहून अधिक घट झाली आहे. 

Air Pollution : शुद्ध हवेसाठी पुण्यातील नागरिक रस्त्यावर, काय केल्या मागण्या?

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com