बकरीचे पिल्लू पाहून सर्वच जण हादरले, चंद्रपूरात काय घडलं?

चेक बेरडी या छोट्याशा गावात बकरीने एका विचित्र पिल्लाला जन्म दिला आहे. त्यामुळे गावात एकच खळबळ उडाली आहे. या पिल्लाच्या जन्माची माहिती मिळताच त्याला पाहण्यासाठी एकच गर्दी झाली होती.

जाहिरात
Read Time: 2 mins
चंद्रपूर:

चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपीपरी तालुक्यातील चेक बेरडी या छोट्याशा गावात बकरीने  एका विचित्र पिल्लाला जन्म दिला आहे. त्यामुळे गावात एकच खळबळ उडाली आहे. या पिल्लाच्या जन्माची माहिती मिळताच त्याला पाहण्यासाठी एकच गर्दी झाली होती. विशेष म्हणजे या पिल्लाचा चेहरा हुबेहूब माणसासारखा आहे. या बकरीला दोन पिल्लं झाली. त्यातलं एक पिल्लू नॉर्मल होतं. पण दुसरं पिल्लू हे सेम टू सेम माणसा सारखं दिसत होतं.  

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

गोंडपिपरी तालुक्यात चेकबिरडी हे लहान गाव आहे. सध्या या गावाची चर्चा सर्वत्र होत आहे. त्याला कारण ठरलं गावातील  मोतीराम आत्राम यांच्या मालकीच्या बकरीने जन्म दिलेलं पिल्लू. या बकरीने बुधवारी दोन वाजताच्या दरम्यान दोन पिल्लांना जन्म दिला. त्यातील एक पिल्लू सामान्य होतं. मात्र दुसऱ्या पिल्लाचा चेहरा बघतात सारे जण हादरून गेले. या पिल्ल्याचे डोळे चेहरा सेम टू सेम  माणसासारखा होता. या विचित्र पिल्लाची माहिती मिळताच गावकऱ्यांनी आत्राम यांच्या घरी मोठी गर्दी केली होती. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - 'ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री दाखवा अन् 1 गावठी कोंबडा, वलगणीचे मासे बक्षीस मिळवा'

जन्म झाल्यानंतर हे पिल्लू नॉर्मल नव्हते. शिवाय ते अशक्तही वाटत होते. पिल्लाला काही करू वाचवं पाहीजे असे आत्राम कुटुंबाला वाटत होते. त्यासाठी आत्राम यांच्या पत्नी छाया आणि त्यांच्या कुटुंबीयांनी त्यासाठी मोठे प्रयत्न केले. मात्र आज गुरूवारी सकाळी नऊ वाजता या पिल्याच्या मृत्यू झाला. या पिल्यावर दफनविधी करण्यात आले. पण या पिल्लाची चर्चा अजूनही होत आहे. सोशल मीडियावर सध्या या पिल्लाचे फोटो जोरदार व्हायरल होत आहेत. हा चमत्कार नसून जनुकीय बदलांच्या परिणाम असल्याचे अभ्यासकांचे मत आहे.

Advertisement