गर्भवती महीलेला जेसीबीच्या सहाय्याने पार करावा लागला नाला

गावातल्या लोकांनी मग एक नामी शक्कल लढवली. जवळच एका रस्त्याचे काम सुरू होते. तेथे जेसीबी उपलब्ध होता. त्यावेळी जेसीबीच्या बकेटमध्ये गर्भवती महिलेला बसवण्यात आलं.

Advertisement
Read Time: 2 mins
गडचिरोली:

गडचिरोलीत पावसाचे थैमान घातले आहे. नद्या नाले तुडूंब होवून वाहात आहेत. अनेक गावांचा संपर्कही तुटला आहे. अशा वेळी इथल्या जनतेची मोठी हेळसांड होताना दिसत आहे. याचा फटता एका गर्भवतीला बसला. तिला प्रसूती कळा येत होत्या. अशा वेळी  रूग्णालयात पोहोचणे गरजेचे होते. पण पाऊस त्यात नाल्यांना पूर आला होता. अशा वेळी रूग्णालयात पोहचणे कठीण झाले होते. गावातल्या लोकांनी मग एक नामी शक्कल लढवली. जवळच एका रस्त्याचे काम सुरू होते. तेथे जेसीबी उपलब्ध होता. त्यावेळी जेसीबीच्या बकेटमध्ये गर्भवती महिलेला बसवण्यात आलं. त्यानंतर ती नाला पार करू शकली. त्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड इथला हा व्हिडीओ आहे. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

गडचिरोली जिल्ह्याच्या दक्षिण भागातील भामरागडमध्ये पावसाळ्यामध्ये नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. आलापल्ली ते भामरागड महामार्गावर ऐन पावसाळ्यात पुलाचे बांधकाम करण्यात आले आहे. नागरिकांना रहदारीसाठी पर्यायी मार्ग देण्यात आला आहे. दरम्यान मुसळधार पावसामुळे तो पर्यायी मार्ग वाहून गेल्याने नागरिकांना रहदारीसाठी मोठी कसरत करावी लागत आहे. त्याचाच फटका एका गर्भवती महिलेला बसला. तिला अचानक प्रसूतीच्या कळा सुरू झाल्या. पण रूग्णालया पर्यंत पोहचता येईल असा रस्ता नव्हता. एकीकडे पाऊस दुसरीकडे रस्ते बंद अशा वेळी मोठा प्रश्न त्या महिले समोर होता. तिचे कुटुंबिय ही चिंतेत होते. 

ट्रेंडिंग बातमी - Exclusive - काँग्रेसच्या 5 आमदारांवर कारवाई निश्चित, मात्र दोन आमदारांवर मेहरबानी ?

तेव्हा पर्याय नसल्याने त्या महिलेला जेसीबीच्या बकेटमध्ये बसवण्यात आले. मध्ये मोठा नाला होता. त्यानंतर त्या महिलेने रस्ता पार केला. पुढे तिला जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे तिच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. मात्र अशा आणीबाणीच्या वेळी करायचे काय असा प्रश्न आता स्थानिक लोक प्रशासनाला विचारत आहेत.