श्रावण महीन सुरू होत आहे. या कालावधीत त्र्यंबकेश्वर इथं दर्शन घेण्यासाठी भाविक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. हे पाहाता त्र्यंबकेश्वर मंदिरात श्रावण महिन्यात सकाळी 4:30 ते रात्री 9:30 पर्यंत दर्शन घेता येणार आहे. यावेळी व्हीआयरी दर्शन बंद नसले तरी काही प्रमाणात त्यावर बंधने घालण्यात आली आहेत. दोनशे रुपये शुल्क देऊन दर्शन घेता येणार आहे.
('NDTV मराठी'चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
त्याच बरोबर राजशिष्टाचार असलेल्या अती महत्त्वाच्या व्यक्तींना सळकी 6 ते 10 वाजताच्या दरम्यान दर्शन घेता येणार आहे. त्याच बरोबर सायंकाळी 6 ते 7 या वेळेतही त्यांनी दर्शन घेता येणार आहे. या मध्ये जिल्हाधिकारी,पोलीस प्रशासन यांचे शिफारस पत्र गरजेचे आहे, असे मंदिर प्रशासनाने स्पष्ट केले आहे. विभागा नुसार 20 जणांना दिवसभरात दर्शन घेता येईल.
ट्रेंडिंग बातमी - ...तर यशश्री वाचली असती? 'त्या' आदेशाकडे दुर्लक्ष करणं महागात पडलं
त्याच बरोबर मंदिराच्या विश्वस्तांच्या शिफारशीने देखील 20 भविकाना दर्शन घेता येणार आहे. या शिवाय मंदिर सकाळी 4.30 ते 9.30 वाजेपर्यंत दर्शनासाठी खुले राहाणार आहे. गर्भगृह दर्शन सकाळी 7 नंतर पूर्ण पणे बंद ठेवण्यात येणार आहे. अती तातडीच्या दर्शना करता मंदिर प्रशासन शुल्क आकारणी ठरविणार आहेत. त्या करीता अति महत्त्वाच्या कामाचा पुरावा द्यावा लागेल.श्रावणात दिवसभरात 14 हजार भाविक दर्शन घेवू शकणार आहेत. याबाबतची माहिती मंदिराचे विश्वस्त कैलास घुले यांनी दिली आहे.