जाहिरात

...तर यशश्री वाचली असती? 'त्या' आदेशाकडे दुर्लक्ष करणं महागात पडलं

आरोपी दाऊद शेख याच्यावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल होता. त्याला लैंगिक शोषणाच्या आरोपाखाली जेलची हवाही खाली लागली होती. तो जामीनावर बाहेर होता.

...तर यशश्री वाचली असती? 'त्या' आदेशाकडे दुर्लक्ष करणं महागात पडलं
नवी मुंबई:

राहुल कांबळे  

यशश्री शिंदेच्या हत्येनंतर अनेक गोष्टी आता हळूहळू समोर येत आहेत. आता आणखी एक गोष्ट समोर आली आहे. ती पाहात यशश्रीचे जीव वाचले असते. ही हत्या टळली असती. आरोपी दाऊद शेख याच्यावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल होता. त्याला लैंगिक शोषणाच्या आरोपाखाली जेलची हवाही खाली लागली होती. तो जामीनावर बाहेर होता. पण त्यानंतरच्या सुनावणीला तो कधीही न्यायालयात हजर राहीला नव्हता. या गोष्टीची न्यायालयाने गंभीर दखल घेतली होती. पुजाची हत्या झाली त्याच्या सहा दिवस आधीच त्याच्या विरोधात अटक वॉरंट काढण्यात आला होता. मात्र त्यावर योग्य कारवाई झाली नाही. त्यानंतर दाऊद उरणमध्ये आला आणि पुढचा अनर्थ झाला. 

('NDTV मराठी'चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा ) 

आरोपी दाऊद याच्यावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल होता. कोरोना काळात त्याला दिड महिना जेलमध्ये राहील्यानंतर जामीन मिळाला होता. तो जामीनावर सुटल्यानंतर कर्नाटकात आपल्या मुळ गावी गेला होता. त्या कालावधीत तो कधीही या प्रकरणाच्या सुनावणीसाठी हजर राहीला नाही. जिल्हा न्यायालयात हा खटला सुरू होता. या खटल्यात तारखांना आरोपी दाऊद हजर राहत नव्हता.यासाठी न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट काढण्याचे आदेश दिले होते. 19 जुलैला या प्रकरणाची तारीख कोर्टात होती. मात्र या तारखेला आरोपी दाऊद गैरहजर राहीला. शिवाय अधिवक्तेही गैरहजर होते. प्रकरणाची गंभीरता लक्षात घेता कोर्टाने 20 जुलैला आरोपी विरोधात पकड वॉरंट जारी केले होते. 

ट्रेंडिंग बातमी -  यशश्री इच्छेने दाऊदला भेटायला गेली होती? पोलिसांच्या पत्रकार परिषदेनंतर उरण हत्याकांडाला वेगळं वळण  

अजामीन पात्र अटक वॉरंट जारी झाल्यानंतर तातडीने कारवाई करणे गरजेचे होते. मात्र ती कारवाई झाली नाही. शेवटी नको तेच झाले. दाऊद शेख हा सतत यशश्रीच्या संपर्कात होता. त्यामुळेत तो तिला भेटण्यासाठी कर्नाटकातून उरणला निघाला. ती तारीख होती 22 जुलै. म्हणजेच वॉरंट निघाल्याच्या दोन दिवसानंतर दाऊद हा उरणला यायला निघाला. दुसऱ्या दिवशी 23 जुलैला तो उरण ला पोहोचला. त्यानंतर त्याने यशश्रीला फोन केला. आपल्याला भेटायचं आहे असं त्याने तिला सांगितले. त्याच्या आग्रहाखातर ती त्याला 24 तारखेला जुईनगर रेल्वे स्टेशनमध्ये भेटली. या भेटीत त्याने तिला आपल्याबरोबर तू बंगळूरूला चल असा आग्रह धरला. पण ती त्यासाठी तयार झाली नाही. दुसऱ्या दिवशीही तू मला भेट असा तो तिला म्हणाला. पण त्यासाठीही ती तयार नव्हती. भेटण्याचे तिने नाकारले होते.   

ट्रेंडिंग बातमी -  यशश्री हत्याकांड : आरोपी दाऊद शेखला 7 दिवसांची पोलीस कोठडी

याचा राग दाऊदला आला. त्याने त्याच्याकडे असलेले तिच्या बरोबरचे काही फोटो फेसबूकवर अपलोड केले. अजून काही फोटो अपलोड करेने अशी धमकी ही त्याने दिली. तो दिवस 25 जुलैचाच होता. दाऊद ब्लॅकमील करत असल्यामुळे ती घाबरली. फोटो डिलट कर असं तिने त्याला सांगितले. त्यानंतर  त्याला भेटण्याचे तिने मान्य केले. ज्या वेळी ती भेटायला गेली त्यावेळी दोघांमध्ये वाद झाला. वाद टोकाला गेला. त्याने बंगळूरूवरून येताना आपल्या बरोबर हत्यार आणले होते. त्याच हत्याराने त्याने यशश्रीची हत्या केली. त्यानंतर काहीच घडले नाही अशा अविर्भावात तो कर्नाटकात पळून गेला. त्यानंतर पोलिसांनी त्याला जेरबंद केले. हेच काम जर सहा दिवस आधी केले असते तर ऐवढे भयंक हत्याकांड झाले नसते. यशश्रीचा जीव वाचला असता.