Beed News: शरद पवार गटाच्या नेत्यांवर प्राणघातक हल्ला; धारदार शस्त्रांनी केले वार
आकाश सावंत, बीड
बीडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते राम खाडे यांच्यावर प्राणघात हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. 10 ते 15 जणांनी धारदार शस्त्रांनी गाडीवर हल्ला केला. अहिल्यानगर - बीड जिल्ह्याच्या सीमेलगत मांदगाव जवळ रस्त्यावर हा हल्ला झाला असल्याची माहिती आहे.
यात राम खाडे हे गंभीर जखमी असून अहिल्यानगरमधील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. हल्लेखोरांनी राम खाडे यांची गाडी पूर्ण फोडून टाकली आहे. राम खाडे यांच्यासोबत 3 ते 4 जण गंभीर जखमी आहेत. हल्ला कुणी केला या संदर्भात अद्याप माहिती मिळू शकलेली नाही.