Bhandara : 15 गुन्ह्यांची उकल, 33 प्रकरणात महत्त्वाची भूमिका; भंडाऱ्याची शान कर्तव्यदक्ष 'नॉटी'ला अखेरचा निरोप

पोलीस दलात रुजू झाल्यानंतर श्वान प्रशिक्षण केंद्र, पुणे येथे त्याने ९ महिन्यांच  खडतर आणि विशेष प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केलं होतं.

जाहिरात
Read Time: 2 mins

अभय भुते, प्रतिनिधी

Bhandara News : भंडारा पोलीस दलात आपल्या उल्लेखनीय कामगिरीचा ठसा उमटवणारा आणि सर्वांचा लाडका श्वान 'नॉटी' याचं अल्पशा आजाराने दुःखद निधन झालं आहे. त्याच्या निधनाने भंडारा पोलीस दलावर शोककळा पसरली असून पोलीस दलातर्फे त्याला शासकीय इतमामात आणि शोक सलामी देऊन अत्यंत जड अंतःकरणाने अखेरचा निरोप देण्यात आला.

जिल्ह्यातील गुन्हेगारी मोडण्यासाठी नॉटी ची विशेष मदत...

श्वान नॉटी याचा जन्म ३० जानेवारी २०१५ रोजी झाला होता. त्यानंतर २६ डिसेंबर २०१५ रोजी तो भंडारा पोलीस दलात अधिकृतपणे भरती झाला. पोलीस दलात रुजू झाल्यानंतर श्वान प्रशिक्षण केंद्र, पुणे येथे त्याने ९ महिन्यांच  खडतर आणि विशेष प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केलं होतं. या प्रशिक्षणाचा वापर त्याने भंडारा जिल्ह्यात गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी अत्यंत प्रभावीपणे केला.

Advertisement


१५ गुन्ह्यांमध्ये चपळाई तर क्रीडा स्पर्धेतही ठरला होता अव्वल...

आपल्या सेवाकाळात नॉटीने अत्यंत चपळाईने आणि बुद्धिमत्तेने तब्बल १५ गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना मोलाची मदत केली. तसेच इतर ३३ गुन्ह्यांच्या तपासात त्याने अतिशय उत्कृष्ट कामगिरी बजावत पोलिसांच्या तपासाला योग्य दिशा दिली. केवळ गुन्ह्यांच्या तपासातच नव्हे, तर क्रीडा क्षेत्रातही नॉटीने आपल्या नावाची मोहोर उमटवली. २०१८ आणि २०१९ मध्ये नागपूर येथे पार पडलेल्या परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धेत त्याने सलग प्रथम क्रमांक पटकावला होता. तसेच, त्याने महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धेतही भंडारा जिल्ह्याचे  प्रतिनिधित्व करून लक्षवेधी सहभाग नोंदवला होता. त्याच्या या अष्टपैलू आणि चमकदार कार्यामुळे 'नॉटी' हा श्वान पोलीस दलात आणि  नागरिकांमध्येही अत्यंत परिचीत झाला होता. आज त्याच्या निधनानंतर पार पडलेल्या अंत्यविधी कार्यक्रमादरम्यान भंडारा पोलिसांकडून त्याला सन्मानपूर्वक 'शोक सलामी' देण्यात आली. श्वान 'नॉटी' याला पुष्पगुच्छ अर्पण केले