Niketan Dalal Death: देशाचे पहिले दिव्यांग आयर्नमॅन निकेत दलाल यांचा मृत्यू; हॉटेलमधील मुक्कामावेळी अनर्थ घडला

Disabled ironman Niketan Dalal Died: रात्री अडीचच्या सुमारास मित्रांनी निकेत यांना एका हॉटेलमध्ये सोडले. पण दुसऱ्या दिवशी सकाळी आठच्या सुमारास निकेत हॉटेलच्या पार्किंगमध्ये पडलेले दिसून आले.

जाहिरात
Read Time: 2 mins

Chhatrapati Sambhajinagar:  महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर येथून एक अतिशय दुःखद घटना समोर आली आहे. देशातील पहिले आणि जगातील पाचवे दिव्यांग आयर्न मॅन निकेत श्रीनिवास दलाल यांचे निधन झाले आहे. मंगळवारी सकाळी समर्थनगर परिसरातील एका हॉटेलच्या दुसऱ्या मजल्यावरून पडल्याने त्यांचे निधन झाले. ही दुर्घटना सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास घडली. निकेत दलाल हे माजी उपमहापौर लता दलाल यांचे पुत्र होते.

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील सफारी महागली! पर्यटकांना मोजावे लागणार 'इतके' पैसे

समोर आलेल्या माहितीनसार, देशातील पहिले व जगातील पाचवे दिव्यांग आयर्न मॅन निकेत श्रीनिवास दलाल यांचा समर्थनगर परिसरातील एका हॉटेलच्या दुसऱ्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला आहे. तनिकेत माजी उपमहापौर लता दलाल यांचे पुत्र होते. दलाल यांच्या घराला 30 जूनला रात्री आग लागली होती.  त्यामुळे घरात थांबणे योग्य नसल्याने रात्री अडीचच्या सुमारास मित्रांनी निकेत यांना एका हॉटेलमध्ये सोडले. पण दुसऱ्या दिवशी सकाळी आठच्या सुमारास निकेत हॉटेलच्या पार्किंगमध्ये पडलेले दिसून आले.

 निकेत दलाल यांनी दुबईसह जगभरात भारताची प्रतिष्ठा वाढवली आहे. 2020 मध्ये, त्यांनी दुबईमध्ये आयर्नमॅन ट्रायथलॉन पूर्ण करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. सायकलिंग, पोहणे आणि धावणे यासारख्या स्पर्धांमध्ये हा पराक्रम करणारे ते पहिले अंध भारतीय होते. आता एका दुःखद अपघातात निकेत दलाल यांनी आपला जीव गमवावा लागला आहे.

Mohammed Shami hasin Jahan case: मोहम्मद शमीला हायकोर्टाचा झटका! पत्नीला दरमहिना द्यावे लागणार लाखो रुपये, 7 वर्षांचं कर्जही