सुनील दवंगे, शिर्डी
Indurikar Maharaj: आपल्या कीतर्नाच्या माध्यमातून राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेले निवृत्ती महाराज इंदोरीकर यांनी कीर्तन सोडण्याचे संकेत दिले आहेत. लेकीच्या साखरपुड्यावर टीका झाल्यानं इंदोरीकर महाराज नाराज असल्याचं बोललं जात आहे. फेटा खाली ठेवण्याचा विचार त्यांनी बोलून दाखवला आहे.
मुलीच्या साखरपुड्यासाठी लाखोंचा खर्च केल्यामुळे इंदोरीकर महाराजांवर सर्वच स्तरातून, विशेषत वारकरी संप्रदायाकडून तीव्र टीका झाली. सध्या सुरू असलेली टीका सहन करण्यापलीकडची आहे. त्यामुळे पुढच्या तीन
(नक्की वाचा- VIDEO: 'लग्न साधं केलं तरी पोरं होतात', मुलीच्या साखरपुड्यानंतर इंदोरीकर महाराज ट्रोल)
इंदोरीकर महाराजांनी या ट्रोलर्सना थेट प्रश्न विचारत आपल्या भावना व्यक्त केल्या. इंदोरीकरांन म्हटलं की, "लोक इतके खाली गेले आहेत की, माझ्या मुलीच्या अंगातील कपडे कसे आहेत, यावरून लोकांचे कमेंट्स आहेत. याच्यापेक्षा वाईट काय असेल? तिच्या बापाला म्हणेज मला घोडे लावा. माझा पिंड गेलाय यात, पण माझ्या मुलाचा आणि मुलीचा काय दोष आहे?"
"माझी मुलं लहान असताना आठ-आठ दिवस माझी त्यांच्याशी गाठ होत नव्हती, आणि आता तुम्ही इतकं खाली गेलात. मुलगी तुम्हालाही आहे. तुमच्या मुलीच्या कपड्यावर एखाद्याने कमेंट केली, तर तुम्हाला काय वाटेल?" असा सवाल देखील इंदोरीकर महाराजांनी उपस्थित केला.
इंदोरीकर महाराजांनी मुलीच्या लग्नात अनाठायी खर्च करू नका, कर्जबाजारी होऊ नका, असे उपदेश इंदोरीकर महाराज आपल्या कीर्तनातून करत असतात. मात्र त्यांच्या मुलीच्या साखरपुड्यात अगदी शाही थाट दिसला होता. त्यांची मुलगी ज्ञानेश्वरीने गाड्यांचा भलामोठा ताफा घेत एन्ट्री केली होती.